One year old child killed in leopard attack, incident at Talwade (Dist. Sangli), child is of Beed district 
कोल्हापूर

हृदयद्रावक! एक वर्षाचं बाळ बिबट्याने तोंडात धरून नेलं, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

शिवाजी चौगुले

शिराळा : तडवळे (ता. शिराळा, जि. सांगली ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुफीयान शमशुद्दीन शेख (वय 1 वर्ष) या ऊस तोडणी मजुराच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, शमशुद्दीन निजामुद्दीन शेख ( वय 27, मूळगाव आनंदगाव ता. माजलगाव जि सांगली ) हे आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह ऊस तोडणीसाठी तडवळे येथे शेतात गेले होते. तडवळे येथील मानकांडे शेतात कृष्णात शामराव पाटील या शेतकऱ्यांचा ऊस तोडत असताना मुलगा सुफीयान यास सावलीला मेव्हणीची सात वर्षाची मुलगी तरन्नुम हिच्या सोबत बसवले होते. 

सर्वजण ऊस तोडण्यात मग्न होते. तरनुम पाणी पीत असताना अचानक उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून सुफीयान याच्यावर झडप घालून त्याची मान पकडून त्यास फरफट नेले. ते पाहून ती मुलगी ओरडल्याने सर्व ऊस तोडणाऱ्यांचे लक्ष तिकडे गेले. तो पर्यंत बिबट्या मुलास घेऊन उसात गेला. 

लोकांनी त्याचा पाठलाग केला असता मुलास उसात सोडून पळून गेला. मुलास घेऊन शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी सांगितले. मुलाच्या मानेवर 11 व पोटावर 4 ठिकाणी अशा 15 ठिकाणी दातांच्या व नाख्यांच्या जखमा झाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश हृदय हेलवणार होता. 

या बिबट्याच्या या मुक्त वावारामुळे तडवळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आले. आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार मानसिंगराव नाईक, उपवनसंरक्षक सांगली वनविभागाचे प्रमोद धानके यांनी भेट दिली. 

15 लाखांची मदत जाहीर 
त्या कुटुंबाला वन विभागामार्फत 15 लाखाची मदत देण्यात येणार असून, त्या पैकी 5 लाख रूपयांची0 तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित 10 लाखाची मदत ही दहा वर्षांची मुदत ठेव स्वरूपात देण्यात येणार आहे. 
- प्रमोद धानके, उपवनसंरक्षक 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT