Onion, Garlic And Potato In Sufficient Quantity to In Kolhapur Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोल्हापूरला कांदा, लसूण, बटाटा पुरेशा प्रमाणात

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर ः कोरोनामुळे देशभर लॉकडाउन आहे. यातून अत्यावश्‍यक सेवा वगळल्या असल्याने शाहू मार्केट यार्डातील कांदा, बटाटा घाऊक बाजारात जवळपास 30 गाड्यांची आवक झाली आहे. कोल्हापूरची रोजची गरज भागेल एवढा कांदा, बटाटा, लसूण आहे. परिणामी लॉकडाउनचा लाभ घेत चढ्या भावात विक्री होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शेतकरी नेते भगवान काटे यांनी केले आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात कांदा-बटाट्याचे उत्पादन नगण्य आहे. येथील घाऊक बाजारपेठेत पुणे, सातारा ग्रामीण, सोलापूर, अहमदनगर ग्रामीण भागातून कांदा मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. तर इंदूर, आग्रा, झाशी या भागातून बटाट्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. 

अशा स्थितीत किरकोळ बाजारपेठेत किराणा दुकानांना सर्वत्र पुरेल एवढा कांदा-बटाटा आहे; मात्र काही किरकोळ विक्रेते 50 ते 150 रुपये दहा किलो भावात घाऊक माल खरेदी करून तीन ते सात किलोमीटर अंतरातील किरकोळ बाजारपेठेत तोच कांदा 30 रुपये, 35 रुपये एक किलो भावात विकत आहेत. असे प्रकार कोणीही करू नयेत. कांदा मुबलक प्रमाणात येत आहे. स्थानिक गरज भागवून कर्नाटक, गोवा, कोकणकडे कांदा पाठविला जात आहे, अशी माहिती घाऊक विक्रेत्यांनी दिली. 

चढ्या भावात विक्री करू नये
लॉकडाउन असला तरी लोकांची नित्य गरज असलेला भाजीपाला, कांदा-बटाटा मुबलक प्रमाणात बाजारपेठेत येतो. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी चढ्या भावात विक्री करू नये. 
- भगवान काटे, शेतकरी नेते 

तूर्त चिंता नाही
कांद्याची आवक पुरेशी आहे. अजूनही कांद्याची आवक वाढू शकते. भावही नियंत्रणात आहेत. त्यामुळे कांदा बटाट्याबाबत कोल्हापूरकरांनी तूर्त चिंता करण्याचे कारण नाही. 
- मनोहर चुघ, व्यापारी 

दहा किलोचे भाव असे 
कांदा ः 50 ते 150 रुपये 
बटाटा ः 190 ते 240 रुपये 
लसूण ः 600 ते 1000 रुपये 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT