Onion potato turnover stalled in Kolhapur market
Onion potato turnover stalled in Kolhapur market 
कोल्हापूर

कोल्हापूर बाजार समितीतील कांदा-बटाटा उलाढाल ठप्प 

निवास चौगले

कोल्हापूर -  विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी सोमवारी कामबंद आंदोलन केल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील गूळ व कांदा-बटाटा विभागाची उलाढाल ठप्प झाली. बाजार समितीतील एक हजार हमाल, तोलाईदार संपात सहभागी झाले होते. 

माथाडी कामगारांसाठी घरकूल योजना तातडीने राबवावी अशी मागणी गेली अनेक वर्षे माथाडी कामगार युनियनची आहे. त्याचबरोबर अनेक बाजार समित्यांमध्ये लेव्हीचा प्रश्नही आहेत. या मागण्यांसाठी माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सोमवारी बाजार समित्या बंदची हाक दिली होती. कोल्हापूर बाजार समितीमधील गूळ, कांदा-बटाटा विभागातील माथाडी कामगार त्यामध्ये सहभागी झाल्याने उलाढाल ठप्प झाली. फळे, भाजीपाला विभाग मात्र सुरूच राहिला. अमावस्येदिवशी जिल्ह्यातील बहुतांशी गुऱ्हाळघरे बंद असतात, त्यामुळे या दिवशी आवक होत नाही. त्यामुळे गूळ विभागावर त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. मात्र, कांदा-बटाट्याचे सौदे झाले नाहीत, त्याचा परिणाम उलाढालीवर झाला. 
या आंदोलनाचा परिणाम गुळाच्या दरावर होणार आहे. या हंगामात गुळाची आवक जास्त होत आहे. सद्या गुळालाही चांगला भाव आहे, पण आंदोलनामुळे सौदे झाले नाहीत तर गुळाचा साठा वाढतो, त्यातून गुळाचा दर पडण्याची शक्‍यता आहे.

अगोदरच शेतीमालाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत आहेत. साखर कारखान्यांकडून प्रतीटन ऊसाला मिळणाऱ्या दराच्या तुलनेत गुळाला चांगला दर मिळतो. अशा परिस्थितीत या ना त्या कारणाने सौदे वेळेत झाले नाहीत तर गुळाचे दर उतरण्याची शक्‍यता आहे. 

 
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

SCROLL FOR NEXT