online home delivery selling vegetables by son and mother in kolhapur 
कोल्हापूर

संचारबंदीतही या माय लेकांची सुरू आहे घरपोच भाजी विक्री... 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - तिखट चटणीचा व्यवसाय संचारबंदी मध्ये बंद झाला, तरीही माय लेकाने जिद्द सोडली नाही. भाज्यांचे पॅकेज करून दर्जेदार पॅकिंग करून घरपोच भाजी विक्रीचा व्यवसाय त्यांनी आता सुरू केला आहे. दुचाकीवर "जीवनावश्यक वस्तू" असा फलक लिहून ते घरपोच भाजी विक्री करीत आहेत. दिवसेंदिवस मागणी ही वाढत आहे.

वाय. पी. पोवार नगर परिसरातील सुधाकर नगरात राहणाऱ्या विद्या शिंदे-चव्हाण आणि प्रतीक चव्हाण या माय लेकाने तिखट चटणीचा व्यवसाय सुरू केला. गेल्या अडीच तीन वर्षात  त्यांनी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. कोल्हापूरसह कोकण,पुणे पर्यंत त्यांनी तयार केलेल्या तिखट ला मागणी वाढत होती. मात्र अचानकच संचारबंदी लागू झाल्यामुळे त्यांचा हा व्यवसाय केली दहा दिवस बंद आहे. पहिले एक-दोन दिवस त्यांनी घरी बसून बसून काढले; मात्र त्यानंतर थेट मार्केटयार्ड येथून घाऊक भाजी खरेदी केली. त्यातून 100 रुपयाचा पॅक तयार केला. यामध्ये कोथिंबिरी, मिरचीसह भाजीपाला दिला जात आहे. सुरुवातीच्या काळात  प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भाजी पाहिजे का अशी विचारणा केली.  आता रोज किमान नव्वद ते शंभर घरामध्ये  भाजीचा पॅक दिला जात आहे.

हातात हॅन्ड ग्लोज, चेहऱ्यावर मास्क, शूज असे सुरक्षित राहून प्रतीक आणि विद्या घरोघरी भाजीपाला पुरवठा करीत आहेत. अनेक ग्राहक आता मोबाईल वरूनच त्यांना ऑर्डर देत आहेत.  पाहता-पाहता रोज हजार रुपयांचा व्यवसाय ते करीत आहेत. आता हाच व्यवसाय पुढे वाढविण्याचा त्यांचा विचार आहे.अनेक ग्राहकांकडून मोबाईलवरच ऑर्डर येते आणि ऑनलाईनच पेमेंट जमा केले जाते. यामुळे आम्ही कोरोना विषाणूपासून संसर्ग होणार नाही याचीही खबरदारी घेत आहोत, असेही प्रतीकने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

100 रुपयाच्या पॅकिंग मध्ये भाज्या लिंबू  यांचाही समावेश आम्ही करीत आहोत.  आवश्यक आहे ते या पॅक मध्ये मध्ये दिले जाते. त्यामुळे आमच्याकडे मागणी वाढत आहे. काही ग्राहकांच्या मोबाईल कॉल वरील मागणीनुसार ही त्यांना भाजी पुरवठा केला जात आहे. घरपोच भाजी दिल्यामुळे भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी ही ही होणारी गर्दी ही ही कमी होण्यास मदत होणार आहे.
विद्या आणि प्रतीक चव्हाण - भाजीपाला विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

SCROLL FOR NEXT