online speech computation bhivshi 
कोल्हापूर

भिवशी येथील आॅनलाईन `वक्तृत्त्व`साठी ११ जिल्हय़ातून स्पर्धक...

डी. एन. बन्ने

सौंदलगा - कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निपाणी तालुक्यातील भिवशी येथील एस. ग्रुपतर्फे 'कोरोनापासून देशाला कसे वाचवता येईल...' या विषयावर ऑनलाईन (व्हाट्सअॅप) स्पर्धा घेण्यात आली. त्यात ११ जिल्हय़ातून तब्बल ५४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. मंगळवारी (ता. १४) स्पर्धेचा निकाल घोषित होणार आहे.
लक्ष्मीकांत पाटील, संजय मगदूम, विशाल पाटील, दिग्विजय वारके यांच्या कल्पकतेतून ही स्पर्धा झाली. त्यात बेळगाव, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, नगर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, बीड, सिंधूदुर्ग या ११ जिल्हय़ातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत ७ ते ७६ वयापर्यंतच्या ८ पुरुष, ८ महिला, १६ मुले, २२ मुली अशा ५४ जणांनी सहभाग घेतला.

विद्यार्थी ,युवक,युवती,गृहिणी ,नोकरदार,व्यवसायीक,निवृत्त कर्मचारी अशा अनेक क्षेत्रातील कर्नाटक व महाराष्ट्रातील आकरा जिल्ह्यातील 54 स्पर्धक वक्ते सहभागी झाले होते.स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विजेते खालीलप्रमाणे...

  • प्रथम - सौरभ पाटील - कोल्हापूर
  • द्वितीय - सौ.गीता शअंकलगी - गोकाक
  • तृतीय - कुणाल वाघ - पुणे


परीक्षक म्हणून एस. बी. गुरव, प्रथमेश पाटील, रघुनाथ हरदारे यांनी काम पाहिले. विजेत्यांना बक्षीस व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली.

`सकाळ`चा प्रतिसादात वाटा मोठा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आॅनलाईन वक्तृत्त्व स्पर्धेचे वृत्त `सकाळ`च्या माध्यमातून जगभरात पोहोचले. त्यामुळे सर्वांपर्यंत ही स्पर्धा गेली. मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादात `सकाळ`चा वाटा मोठा असल्याचे संयोजक लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

कोरोनाबाबत प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे. त्यामुळे आज परीक्षणावेळीही परीक्षक व संयोजकांमध्ये स्क्रिन पाहताना `सोशल डिस्टन्सिंग` ठेवले होते. तसेच स्पर्धकांकडून कोरोनाच्या नायनाटासाठी अनेक नवीन उपाययोजना समजल्या.
-संजय मगदूम, संयोजक, भिवशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT