The online thrill of armament 
कोल्हापूर

शस्त्रविद्येचा ऑनलाईन थरार 

मोहन मेस्त्री :

कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे संस्था संचलित मर्दानी आखाडा प्राचीन शस्त्रविद्या प्रशिक्षणाचे काम अनेक वर्षे करीत आहे. लॉकडाउनमध्ये वेळेचा उपयोग व्हावा, यासाठी संस्थेतर्फे प्राचीन शस्त्रविद्या ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे. 
या प्रशिक्षणामुळे कोल्हापूरसह भारताबाहेर सौदी अरेबिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोप खंडातील मराठी बांधव मुलांना प्राचीन शस्त्रविद्या ऑनलाइनच्या माध्यमातून शिकवत आहेत. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यासाठी कार्यरत आहेत. 
क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे संस्थेतर्फे दरवर्षी शस्त्रविद्या प्रशिक्षणासाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यात महाराष्ट्रातून मुले व मुली मोठ्या संख्येने सहभागी होतात. प्रात्यक्षिकांचे सादरीकरण महाराष्ट्रसह दिल्ली, हरियाना, कर्नाटक, गुजरातपर्यंत झाले आहे. 
आजपर्यंत हजारो मुला-मुलींना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मुलींनी स्वसंरक्षणासाठी तरबेज व्हावे, शस्त्र नसताना संकटकाळी सुटका व्हावी यासाठी शिबिर घेण्यात येते. प्राचीन शस्त्रविद्या ऑनलाईन प्रशिक्षणात अडीच हजार शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. त्यात 800 मुलींचा सहभाग आहे. ही शस्त्रविद्या प्रत्येक मुलीने शिकावी, यासाठी संस्था प्रयत्न करते. 
सोशल मीडियावरून अंतर्गत माहिती पोचविणे, उपक्रमाची माहिती देण्यासाठी प्रशिक्षक काम करीत आहेत. देशासह परदेशातही मराठी बांधव या उपक्रमात सहभागी होत मुलांना शस्त्रविद्येचे धडे घेत आहेत. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संस्थेने यू-ट्यूबवर 'प्राचीन शस्त्रविद्या' या नावाने चॅनेल सुरू केले आहे. त्यावर प्रशिक्षणासंदर्भात व्हिडिओ अपलोड केले जातात. यामुळे इच्छुक वेळेनुसार याचा लाभ घेऊ शकतात. शिकाऊ मुला-मुलींचे व्हॉट्‌सऍप ग्रुप बनविले आहेत. 
सराव करताना काही शंका असतील तर ग्रुपवर निरसन केले जाते. शस्त्र हातात धरायचे कसे, पासून ते पवित्रा कसा घ्यायचा? याचे व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले जाते. यात लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदी कलांचा समावेश आहे. 

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी आहे, बहुतांश लोक मोबाईलमध्येच दंग असतात. केवळ करमणुकीपेक्षा या वेळेत शस्त्रविद्या शिकावी, याचा आरोग्य आणि आत्मनिर्भर होण्यासाठी उपयोग होईल. 
- प्रमोद पाटील, अध्यक्ष, क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup बाबत ICC आज मोठा निर्णय घेणार, जय शहा बांगलादेशला धक्का देण्याच्या तयारीत

माेठी अपडेट! ‘शालार्थ’मध्ये कागदपत्रे अपलोड न केल्यास थांबणार वेतन; १५ फेब्रुवारीपासून खासगी अनुदानित शाळांवर निर्बंध..

Latest Marathi news Live Update: आयएस आयपीएस अधिकारी दहा हजार शाळा आणि 6 लाख विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे धडे देणारा ध्येयवेडा शिक्षक

Pune : रोडरोलरनं ४ वर्षीय मुलाला चिरडलं, रस्त्याच्या डांबरीकरणावेळी भीषण दुर्घटना

Gold Silver Price Update : सोने ४ हजार तर चांदी १५ हजारांनी घसरली, पण पुन्हा दर वाढले; मागच्या चार दिवसांतील जाणून घ्या स्थिती

SCROLL FOR NEXT