fb m 
कोल्हापूर

नादच खुळा की ! जवानाचं लग्न फेसबुक लाईव्ह द्वारे ; अक्षता पडल्या ऑनलाईनच...

दिनकर पाटील

नेसरी (कोल्हापूर) - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन आहे. त्याचा परिणाम जसा साऱ्या क्षेत्रावर झाला आहे, तसे काही सामाजिक बदलावरही झाला आहे. लग्न कार्य हे त्यापैकीच एक आहे. संचारबंदीमुळे मोठ्याने लग्न करण्यास बंदी आहे. यामुळे अर्जुनवाडीतील एक सीआरपीएफ जवानाने आपला विवाह फेसबुक लाईव्ह द्वारे केला आहे. अर्जुनवाडीतील अविनाश दोरूगडे व कुदनूर (ता.चंदगड) येथील रूपाली निर्मळकर यांचा विवाह आज या अनोख्या पद्धतीने झाला आहे.

या विवाहाला आदीचशेहून अधिक पाहुणे व मित्रमंडळींनी जेथे आहे तेथूनच ऑनलाइन वरूनच अक्षता टाकून नवं वधू वराला शुभेछा दिल्या. आज सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी झाला. अविनाश हे सी आर पी एफ मध्ये जवान आहेत. सध्या ते झारखंड येथे कार्यरत आहेत. कुदनूर येथील रुपाली व अविनाश यांचा साखरपुडा नोव्हेंबर महिन्यात झाला होता. 8 मे रोजी त्यांचा विवाह होणार होता. त्यासाठी अविनाश सुट्टीवर आले होते. परिनामी सध्या कोरोना विषाणूमुळे देशात संचारबंदी आहे.

विषाणू अधिकच फैलावू लागल्याने त्यांना कधीही सेवेत रुजू व्हावे लागणार आहे. यामुळे लवकरात लवकर त्यांना लग्न पार पडायचे होते. त्याच्यावरच घरची मंडळी विचार करत असताना फेसबुक लाईव्ह ची कल्पना सुचली. त्यासाठी दोन्ही कडील नातेवाईकांनी त्यास संमती दिली. शेतातील एक मंदिरासमोर जाऊन अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित वधू वराने आपले लग्न दोन फेसबुक अकौंट द्वारे लाईव्ह केले. पाहुणे व मित्रमंडळींना त्याची कल्पना देऊन ऑनलाइन राहण्यास संगितले. आज सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी अक्षताही पडल्या. पाहुने व नातेवाईकांनी जेथे उपस्थित असतील तेथूनच आशीर्वाद दिले. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे.

आहेर स्वीकारून निधीत जमा

विशेष म्हणजे या लग्नासाठी आहेर स्वीकारला आहे. यातून जमा झालेली रक्कम कोरोना ला हरविण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे ठरविले आहे. तसेच आपल्या आप्तेष्टना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपासमारीत असलेल्या कुटुंबाना अन्न दान करण्याचे आवाहन करून स्वतःही अन्न दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT