Only admin can send message 
कोल्हापूर

‘ओन्ली ॲडमिन कॅन सेंड मेसेज’

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर आलेले आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यास पोलिस प्रशासनाने सुरवात केली आहे. व्हॉट्‌सॲप ग्रुपवर अफवा, तेढ पसरविणारे मेसेज टाकले तर ग्रुपच्या ॲडमिनसह ज्या सदस्याने मेसेज टाकला, त्याच्यावर कारवाई होते. हे टाळण्यासाठी अनेक जणांनी आपल्या ग्रुपची सेटिंग ‘ओन्ली ॲडमिन कॅन सेंड मेसेज’ अशी केली आहे. ग्रुपची सेंटिग अशी करण्याबाबत पोलिस प्रशासनानेही आवाहन करण्यास सुरवात केली. 

‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले. असे मेसेज व्हॉट्‌सॲप ग्रुपवर फॉरवर्ड होऊ लागले. समाजात चुकीचे संदेश पसरू लागल्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली. १ एप्रिलला कोरोनाच्या बाबतीत एप्रिल फूल म्हणून चुकीचे मेसेस फिरू नयेत, यासाठी प्रशासनाने आवाहन केले होते. तेव्हापासूनच अनेक ग्रुपच्या ॲडमिननी ग्रुपचे सेटिंग्सही बदलले आहेत. ॲडमिनशिवाय कोणीही ग्रुपवर मेसेज टाकणार नाही, याची माहिती त्यापूर्वीच सदस्यांना दिली गेली. सदस्यांनीही त्याला मान्यता दिली. आणि रोज ॲक्‍टिव्ह असणारे ग्रुपही शांतच आहेत. 

कोरोनाचे संकट वाढत असतानाच अशा अफवा पसरविणाऱ्या सदस्य व ग्रुपच्या ॲडमिनवर गुन्हे नोंद होण्याचे प्रमाण वाढले. यानंतर पोलिस प्रशासनानेही व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या ॲडमिनचे प्रबोधन करण्यास सुरवात केली आहे. 

मी जवळपास बारा ग्रुपमध्ये सदस्य आहे. त्यापैकी दोन ग्रुपचा ॲडमिन आहे. या सर्व ग्रुपची सेंटिग्स आम्ही बदलली आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह मेसेज टाकत नाही. 
- कौस्तुभ दंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT