कोल्हापूर

कोरोनामुळे झेडपी कर्मचाऱ्यांच्या बदल्या नंतरच 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. राज्य शासनाने 10 ऑगस्टपर्यंत या बदल्या करण्याचे आदेश दिले; मात्र जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच महापुराचेही संकट आले आहे. त्यामुळे या बदल्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शिक्षकांच्या पदोन्नतीचा विषय मात्र मार्गी लागणार आहे. सोमवारी शिक्षण विभागातील जवळपास 100 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. यात मोठ्या प्रमाणात मुख्याध्यापकांचा समावेश आहे. 
कोरोनामुळे बदल्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता; मात्र शासनाने मर्यादित संख्येत बदल्या करण्यास मान्यता दिली. ही मुदत 31 जुलैपर्यंत दिली होती, मात्र ही मुदत वाढवत 10 ऑगस्ट केली. शनिवारी व रविवारी या सुटीच्या दिवशी बदलीचे नियोजन केले. बदलीपात्र कर्मचारी व सर्व खातेप्रमुखांना याबाबत सूचना देऊन कार्यालय सुरू करण्याचे आदेशही दिले होते, मात्र शुक्रवारी संध्याकाळी सर्किट हाउस येथे जिल्हा परिषदेच्या बदल्यांबाबत बराच वेळ चर्चा झाली. काही प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते. याच बैठकीत बदल्यांबाबत चर्चा झाली. यानंतर बदल्यांचा विषय पुढे ढकलला. 

कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी शिक्षण विभागातील शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी पदोन्नतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सोमवारी व मंगळवारी ही पदोन्नती दिली जाणार आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात 30, सायंकाळच्या सत्रात 30 व मंगळवारी उर्वरित शिक्षकांना पदोन्नतीसाठी बोलवण्यात येणार आहे. याबाबतची तयारी सामान्य प्रशासन विभागाने केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT