Only four beds available in private hospital at Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात खासगी रुग्णालयात केवळ चारच बेड ; व्हेंटिलेटरचा एकही बेड नाही शिल्लक

वसकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शहरातील खासगी रुग्णालयातील ‘बेड’ उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईनला दोन मिनिटांनी एक कॉल येत आहे. हेल्पलाईनच्या सायंकाळी सातला असलेल्या अपडेटमध्ये खासगी रुग्णालयात केवळ चारच बेड शिल्लक होते. त्यात एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याचे सांगण्यात आले. ‘सीपीआर’मध्ये एकूण ३७० बेड असून, त्यापैकी ११३ नॉन ऑक्‍सिजन आणि ऑक्‍सिजनचे ६० बेड सायंकाळपर्यंत शिल्लक होते. मात्र, व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते.

शहरातील एकाही रुग्णाचा विनाउपचार मृत्यू होणार नाही. प्रत्येकाला बेड देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी केली आहे. तेथील तीन मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. या क्रमांकावर संपर्क साधल्यास शहरात कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी कक्षातून २४ तास ही सेवा दिली जात आहे. येथे एकूण नऊ कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारीही आहेत. सायंकाळपर्यंत कक्षातून दिलेल्या माहितीनुसार शहरातील खासगी रुग्णालयात केवळ चार बेड शिल्लक होते. आयसीयूतील व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नव्हता.

शहरातील एकूण २६ खासगी रुग्णालये पालिकेने ताब्यात घेतली आहेत. त्या ठिकाणी रुग्ण दाखल करण्यासाठी तेथील बेडची आवश्‍यकता किती आहे, याची माहिती क्षणाक्षणाला सॉफ्टवेअरद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात मिळत आहे. त्यानुसार सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत दोन मिनिटांना एक कॉल येत आहे. असाच एक कक्ष ‘सीपीआर’मध्ये तयार केला आहे. तेथेही आलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सॉफ्टवेअरचा उपयोग होत आहे.

सायंकाळी सातच्या सुमारास खासगी आणि ‘सीपीआर’मध्ये एकही व्हेंटिलेटरची सोय असलेला बेड नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात शहरातील २७ खासगी रुग्णालयांत व्यवस्था केल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरीही अद्याप सहा-सात रुग्णालयांकडून तांत्रिक बाबी पूर्ण न झाल्याने तेथे प्रतिसाद मिळत नाही.

दृष्टिक्षेपात
 शहरात २० रुग्णालये प्रशासनाकडे नोंद (कागदावर २७)
 खासगी रुग्णालयात एकूण ३५१ बेड
 ऑक्‍सिजनची व्यवस्था असलेले बेड १७२
 नॉनऑक्‍सिजनचे बेड १२६ 
 एकूण ५३ आयसीयू

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

SCROLL FOR NEXT