कोल्हापूर

केवळ मयताच्या कुटुंबाचाच नैवेद्य 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रुद्रभूमीत (स्मशानभूमी) माती सारवण्यादिवशी अन्नाची नासाडी थांबण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजातील ज्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले आहे, ते कुटुंबच केवळ एक नैवेद्य ठेवेल, असा निर्णय घेतल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांनी आज दिली. 

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची प्रथा, माती सावरण्यादिवशी पै-पाहुण्यांची गर्दी, दफन केलेली जागा शेणाने सावरून गोमूत्र शिंपडण्याची रीत व त्या ठिकाणी नैवेद्याचा पडलेला खच, हे नेहमीचे चित्र आहे.

कावळ्याने नैवेद्य शिवल्यानंतर काही नैवेद्य कुत्र्या व मांजरांच्या पोटात जातात. उर्वरित कोंडाळ्यात टाकून त्यांची नासाडी होते. दफन केलेल्या जागेवर ठेवणे नैवेद्य ठेवून तो मृत व्यक्तीपर्यंत पोचू शकत नाही, असा समाजाने वैज्ञानिक विचार केला. माती सावरण्यादिवशी बराच वेळ खर्च होत असल्याचेही समाजाच्या लक्षात आले. त्या ऐवजी सकाळी आठ ते नऊ या वेळेतच हा कार्यक्रम आटोपण्याचा समाजाने निर्णय घेतला आहे. 
ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच कुटुंबाने केवळ एक नैवेद्य ठेवावा. अन्य पै-पाहुण्यांनी नैवेद्य आणू नयेत, असे आवाहन केले आहे. उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी, सचिव राज वाली, राजेश पाटील-चंदूरकर, नानासाहेब नष्टे, ऍड. सतीश खोतलांडे, किरण सांगावकर, चंद्रकांत हळदे, बाळासाहेब शेटे, शंकर कदम, कुमार हिरेमठ, सुभाष चौगुले, सुहास भेंडे, मनोहर गाडवे, बी. एस. पाटील उपस्थित होते. 

"संचारबंदीत अन्नाची नासाडी टळली,' या शीर्षकाखाली "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. संचारबंदीच्या काळात रक्षा विसर्जनादिवशी एकच नैवेद्य ठेवल्याने अन्नाची नासाडी कशी कमी झाली, याची माहिती त्यातून दिली होती. या बातमीच्या अनुषंगाने वीरशैव लिंगायत समाजाने माती सावरण्यादिवशी विधायक पाऊल उचलले आहे. 
- राजू वाली, सचिव, वीरशैव लिंगायत समाज.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT