opposition of locals in Jyotinagar to quarantine the corona suspects  
कोल्हापूर

संशयितांना कॉरन्टांइन करण्यास ज्योतिनगरात स्थानिकांचा तीव्र विरोध...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असताना दुसरीकडे कॉरन्टाइन करण्यात आलेल्या संशयिताना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी सर्वत्र विरोध केला जात आहे. काल अनगोळ येथील संतमीरा शाळेत कॉरन्टाइंन संशयिताना ठेवण्यास स्थानिकांनी विरोध केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा गणेशपूर आणि ज्योतीनगरात कोरन्टाइंन संशयिताना ठेवण्यास स्थानिकांनी तिव्र विरोध केला. त्यामुळे अखेर प्रशासनाला संशयिताना त्याठिकाणी ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला.

ज्योतीनगर येथील बीसीएम हॉस्टेलमध्ये कॉरन्टाईन संशयिताना ठेवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पुर्वतयारी करण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिकांना समजल्याने नागरीकातुन संतत्प प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे याला तिव्र विरोध दर्शविण्यात आला. सदर हॉस्टेलच्या आजुबाजुला चारशेहुन अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. तर तब्बल बाराशेहुन अधिक सफाईकामगार देखील त्याठिकाणी आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थित ज्योतीनगर परिसरात कॉरन्टाइंन रुग्ण ठेवण्यात येउ नये, अन्य त्याचे तिव्र पडसाद उमटतील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले, ज्योतीनगर परिसरात सफाई कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागात कॉरन्टांइन संशयिताना ठेवणे पुर्णपणे चुकीचे आहे. पहिल्यांचा हा परिसरात अस्वच्छ आहे. कदाचीत जर या भागात कोरोनाची लागण झाल्यास मुंबईतील धारावीतील परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

ग्राम पंचायत सदस्य मोहन गरग म्हणाले, या भागात परिशिष्ठ जाती आणि जमातील लोकसंख्या अधिक आहे. त्यातच येथील 900 जण कोरोना वारियर्स म्हणून काम करीत आहेत. अशा परिस्थिती याठिकाणी कोणालाही कॉरन्टाईन ठेवण्यात येउ नये. विरोध डावलून देखील कॉरन्टाइंन ठेवण्याचा प्रयत्न केल्यास शासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कॅम्पचे पोलीस निरीक्षक डी. संतोषकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देउन संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कॉरन्टाइंन संशयिताना ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT