Opposition to teaching process reports online 
कोल्हापूर

अध्यापन प्रक्रिया अहवाल ऑनलाईन करण्यास विरोध ; आदेश रद्द न केल्यास बहिष्कार 

सदानंद पाटील

कोल्हापू : राज्यातील शिक्षक कोरोनाच्या कामात व्यस्त आहेत. हे करत असताना ऑनलाईन अध्ययन-अध्यापनाची साप्ताहिक माहिती लिंकवर भरण्यासाठी परिपत्रक काढले आहे. ही माहिती लिंकवर भरावयास लावण्यामुळे शिक्षक व शिक्षण प्रक्रियेतील अधिकारी यांच्यावर गैरविश्‍वास दाखवल्याचा प्रकार आहे. त्यामुळे हे अध्ययन -अध्यापन माहिती भरण्याचे आदेश रद्द करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. जर आदेश रद्द केले नाहीतर या प्रक्रीयेवर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. 

सद्य स्थितीत राज्यात ग्रामीण भागात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळा बंद शिक्षण सुरु हा उपक्रम सुरु आहे. या अंतर्गत राज्यातील शिक्षक प्राप्त परीस्थितीत ऑनलाईन अध्यापन करत आहेत. यामध्ये झूम, गुगल मिट या सारख्या नवीन तंत्रज्ञान वापर करीत विद्यार्थ्याना अध्यापन करत आहेत. तसेच काही शिक्षकांनी स्वाध्याय पुस्तिका विकसित करून विद्यार्थ्यापर्यंत पोहोच केल्या आहेत. असे असताना ऑनलाईन साप्ताहिक माहिती भरण्या संदर्भात परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाने शिक्षकांत असंतोष निर्माण झाला असून हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

परिपत्रक रद्द नाही केल्यास शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक लिंक भरण्याच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालणार आसल्याचे पत्रक शिक्षक संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, मोहन भोसले, एन वाय पाटील, जनार्दन निउनगरे ,रघुनाथ खोत, सुनील पाटील, बाळकृष्ण हळदकर, दुन्देश खामकर, अरुण चाळके, किरण शिंदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.  

  संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

Marathi News Live Updates : 'सुभाष देसाई' प्रकरणात या न्यायालयाने अपात्रतेचा प्रश्न हाताळला नव्हता - न्यायमूर्ती

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

SCROLL FOR NEXT