The ornamental fish business is in trouble due to the stoppage of foreign imports 
कोल्हापूर

Video - परदेशातून येणारी अवाक थांबली ; शोभेच्या माशांचा व्यवसाय अडचणीत  

सुयोग घाटगे

कोल्हापूर : शोभेचे माशे सांभाळणे, विविध शोभिवंत पक्षी घरामध्ये असणे ही अनेकांची हौस आहे. यातूनच विविध प्रकारचे शोभिवंत मासे आणि पक्षी हे बाहेरील देशातून आणून सांभाळले जातात. मात्र सध्या लॉकडाऊनचा फटका या हौशी मंडळींना बसला आहे.  शिवाय सध्याच्या परिस्थितीमुळे या शोभिवंत माशांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत. येणाऱ्या मालाचीच अवाक थांबल्यामुळे नेमके विक्री कशाची करायची हा प्रश्न या व्यवसायिकांसमोर आहे.  


अनेकांच्या घरामध्ये शोभेच्या माशांची पेटी असते. या पेटीमध्ये फिरणारे लहान मोठे रंगबिरंगी अनेक माशे असतात. प्रत्येकाच्या हौसेनुसार पेटीचा आकार लहान मोठा असतो. शिवाय या पेटीमध्ये माशांसह काहींच्याकडे निव्वळ संगोपनासाठी असणारे कासव देखील आपल्या नजरेस पडते. मात्र या हौशी लोकांचा हिरमोड सध्या झाला आहे. कोरोनामुळे सर्वत्रच लॉकडाऊन असल्यामुळे या माशांची अवाक घटली आहे. विक्रेत्यांकडे विक्रीसाठी माशे उपलब्ध नाहीत. या पेटीमधील माशांना लागणारे खाद्य देखील बाहेरील देशातूनच आयात केले जाते. पेटीच्या सजावटीसाठी असणाऱ्या अनेक गोष्टी तसेच पेटीचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी लागणारे हिटर, क्लिनिंग फिल्टर, ऑक्सिजन मशीन , लाईट हे सर्व देखील आयात केले जाते. 80 टक्केहून अधिक माल हा आयात  केला जात असल्यामुळे हा व्यवसाय सध्या पाण्यात आहे. 


भारतामध्ये सर्वात मोठी अवाक ही चैन्नई मध्ये होते. येथून पुढे देशभर हा माल पोचवला जातो. सर्वाधिक मासे हे बँकॉक, पटाया, मलेशिया, थायलँड येथून तर त्यांचे खाद्य हे चीन, बँकॉक मलेशिया येथून येते. भारतामध्ये शोभिवंत मास्यांचे उत्पादन मागणीच्या मानाने अल्प प्रमाणात होते. 

गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ हा व्यवसाय बंद आहे. उपलब्ध असणारे माशे आणि खाद्य या मध्येच व्यवसाय सुरु आहे. शिवाय आवाक घटल्यामुळे आणि शिल्लक माल चढ्या किमतीने खरेदी करावा लागत असल्यामुळे दर वाढले आहेत. याचा परिणाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

-वसीम काझी, व्यावसायिक 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

Maharashtra Census: महाराष्ट्रात जनगणना कधी सुरू होणार? हा कार्यक्रम किती काळ चालणार? तारखा आल्या समोर...

SCROLL FOR NEXT