... otherwise the CPR will become the center of the spread 
कोल्हापूर

...अन्यथा सीपीआरच बनेल फैलावाचे केंद्र 

सकाळन्यूजनेटवर्क

कोल्हापूर : कोरोना पॉझीटीव्ह आणि संशियतांवरही सीपीआरमध्ये उपचार केले जातात, पण प्रत्यक्ष कोरोना कक्षात सुविधांचा अभाव आहे. परिसरात फिरणारे कारकून, शिपाई यांना "एन-95'चे मास्क पण प्रत्यक्ष कक्षात काम करणाऱ्या परिचारिकांना मिळत नाहीत.

संशयित रूग्ण असलेल्या कक्षातील परिचारिकांना पीपीई किटच दिली जात नाहीत. त्यातूनच जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या 18 परिचारिकांना काल अलगीकरण कक्षात ठेवले आहे. प्रशासनाने अशा छोट्याशा सुविधांकडेही लक्ष न दिल्यास सीपीआर हॉस्पिटलच कोरोनाचा फैलाव करणारे केंद्र बनेल, अशी भिती व्यक्त होत आहे. 

सीपीआर प्रशासनाकडे सध्या 400 ते 450 परिचारिका आहेत. यापैकी किमान 250 परिचारिका कोरोना कक्षात काम करत आहेत. ज्या कक्षात कोरोनाचे पॉझीटीव्ह रूग्ण आहेत, तेथील परिचारिकांना चार तासांची तर पॉझीटीव्ह रूग्णाच्या तीव्र संपर्कात आलेल्या संशयितांना ठेवलेल्या कक्षातील परिचारिकांना आठ तासांची ड्युटी लावली जाते. पॉझीटीव्ह रूग्ण असलेल्या कक्षातील परिचारिकांनी एकदा का पीपीई किट घातली तर त्यांना चार तास अन्न-पाणी घेता येत नाही, एवढेच नव्हे तर नैसर्गिक विधीही करता येत नाही. 

याउलट या कक्षात पाच मिनिटांसाठी तपासणी येणाऱ्या डॉक्‍टरांना हा मास्क दिला जातो. प्रशासनातील कारकून, शिपाई यांनाही हा मास्क मिळतो. पण परिचारिकांना तो मिळत नाही. मागणी केली तर देतो एवढेच आश्‍वासन दिले जाते. संशयित रूग्णांच्या कक्षातील परिचारिकांनाही चार तासांचीच ड्युटी लावली पाहीजे, त्यासाठी परिचारिका कमी पडल्या तर महापालिकेच्या आस्थापनेवरील परिचारिकांना सीपीआरकडे घेता येत नाही. पण याची कोणतीही तयारी सीपीआरमध्ये नाही. त्यामुळेच काल अलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयितांच्या सेवेतील 18 परिचारिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले. उद्या हीच परिस्थिती इतर परिचारिकांवर येण्याची शक्‍यता आहे, त्यातून सीपीआर हेच कोरानाचा फैलाव करणारे केंद्र बनले अशी भिती व्यक्त होत आहे. 

शासनाकडून कोराना कक्षात काम करणाऱ्या सर्वांसाठी पुरेशा सुविधा प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यात मास्क, किट यांचाही समावेश आहे. पण त्या परिचारिकांना दिल्या जात नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडेही तक्रार केली. अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्याही कानावर हा विषय घातला तर कोण मागायलाच येत नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. यावर लवकर मार्ग निघाला नाही तर कोरोनाचे केंद्र सीपीआर व्हायला वेळ लागणार नाही. 
- हशमद हावेरी, अध्यक्षा, राज्य नर्सिंग फेडरेशन. 

कोरोना कक्षात वेगवेगळ्या शिप्टमध्ये परिचारिकांना काम दिले आहे. कक्षात जाण्यापूर्वीच ग्लोज, मास्क व पीपीई किट अशी सुरक्षेची साधने घातल्यानंतर प्रवेश दिला गेला आहे. परिचारिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी पूर्णपणे घेतली आहे. तरीही खबरदारीचा भाग म्हणून संबधीत परिचारिकांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. 
- डॉ. मिनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शाहू वैद्यकीय महाविद्यालय 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT