Outside the Radhanagari Sanctuary, the bauxite mafia spread its arms 
कोल्हापूर

राधानगरी अभयारण्याबाहेर  बॉक्‍साईट माफियांनी पसरले हात 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्य कार्यक्षेत्रात होणाऱ्या उत्खननावर कडक निर्बंध लागले असले तरी अभयारण्याबाहेर सुरू असलेल्या चोरट्या बॉक्‍साईट उत्खननावर निर्बंध कोण घालणार? हा प्रश्न पुढे आला आहे. दुर्गमानवाड परिसरातील चाफेवाडी, धुमाळवाडी, पडसाळी परिसरात अनेक खासगी मालकीच्या क्षेत्रात बॉक्‍साईडचे राजरोस उत्खनन सुरू आहे. 
गेल्याच आठवड्यात यापैकी एका उत्खननावर खनिकर्म विभागाने कारवाई केली; मात्र ही कारवाई जुजबी ठरल्याचे पुढे आले आहे. या ठिकाणी रस्ता करून पोकलॅण्डद्वारे उत्खनन सुरू आहे आणि या परिसरातील सर्वांना ही खाण सुरू असल्याचे ज्ञात आहे. राधानगरी तहसील विभागातील लोकांनीही याचा पंचनामा केला होता. त्यानंतर 48 तासांत ही खाण पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे याचे गौडबंगाल समजलेले नाही. 
परिसरात सुरू असलेल्या बॉक्‍साईट उत्खननात तालुक्‍याबाहेरील अनेक माफियांचा हात असल्याचे स्थानिक लोकांकडून सांगण्यात आले. अनेकांच्या मालकी क्षेत्रातील बॉक्‍साईट शोधायचे आणि त्यांना नाममात्र पैसे देऊन तेथे उत्खनन सुरू करायचे, हा नवा फंडा सुरू झाला आहे. दुर्गमानवाड हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येते. याचा परिसरही नव्या इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आला आहे. याच्यात काठावर चाफेवाडी, धुमाळवाडी ही गावे आहेत तर पडसाळी परिसरातील चव्हाणवाडी हे तर थेट इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येते. येथेही सध्या उत्खनन सुरू आहे. यावर कुणाचा अंकुश नसल्यासारखी स्थिती आहे. जिल्हा खणीकर्म विभागाने चाफेवाडी येथील उत्खननावर दीड लाखांचा दंड केल्याची समजते. हा दंड करूनही आज इथे उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे या माफियांना बड्या हस्तीचा हात आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे. अभयारण्यासभोवती असे प्रकार घडू लागल्याने यावर प्रतिबंध घालावा अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे. 


कारवाई करू ; तहसीलदार निंबाळकर 
इको सेन्सिटिव्ह झोन आणि त्याच्या बाजूला लागून असलेल्या कोणत्याही परिसरात बॉक्‍साईटचे उत्खनन सुरू असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. तळगावच्या परिसरात एका खाणीवर आम्ही कारवाई केलेली आहे. अजूनही सुरू असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करून मालमत्ता जप्त केली जाईल, अशी माहिती तहसीलदार मीना निंबाळकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

Pune Truck Accident : ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील घटना!

Hadapsar OPD Closure : हडपसरमधील बाह्यरुग्ण सेवा बंद; डॉक्टरांचा तोडफोडी विरोधातील इशारा!

SCROLL FOR NEXT