Oximeter app fraudulent network, risk of data theft from fake app 
कोल्हापूर

सावधान ः ऑक्‍सिमीटर अँपचे फसवे जाळे, बनावट अॅपकडून डेटा चोरीचा धोका

सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोरोनामुळे सर्वानाच आरोग्याची काळजी आहे. सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती ऑक्‍सिमीटरची. शरीरातील ऑक्‍सिजनाचे प्रमाण मोजणारे हे मीटर विशेष चर्चेत आहे. त्याची वाढती मागणी आणि किंमतीचा गैर फायदा घेण्यासाठी हॅकर सज्ज झाले आहेत. विविध बनावट अँप्लिकेशनची निर्मितीकरून त्याद्वारे वापरकर्त्यांची वयक्तिक माहिती चोरण्याचे प्रकार सुरु आहेत. 

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये देखील हॅकर्सनी नागरिकांच्या वयक्तिक माहितीवर डल्ला मारण्याची तयारी केली आहे. सध्या सर्वाधिक चर्चेत आणि वापरात असणारे ऑक्‍सिमीटर यासाठी निवडले आहे. बाजारपेठेत उपलब्ध ऑक्‍सिमीटरची किंमत एक हजार रुपयांहून अधिक आहे. यामुळे अनेकांनी स्वस्त पर्याय शोधण्यास सुरवात केली आहे. यातूनच हॅकर्सनी बनावट अँप्लिकेशनच्या निर्मितीने वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रकार सुरु केला आहे. असे अनेक बनावट अँप्लिकेशन सध्या अँड्रॉइड आणि आय.ओ.एस. फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. या बनावट अँपचा वापर करणाऱ्या व्यक्तीच्या फोन मधून संपर्क क्रमांक, फोटो आणि व्हिडीओ, बॅंकेची माहिती, ऑनलाईन पेमेंट माहिती, विविध पासवर्ड आणि सांख्यिकीमाहिती चोरण्याचा धोका आहे. 
ऑक्‍सिमीटर वापरण्या ऐवजी ऍपद्वारे मोबाईल लाईटवर बोटांनी किंवा फिंगरप्रिंट लावून स्तर मोजले जाऊ शकत असल्याचा दावा या अँप मधून केला जातो. मात्र अश्‍या पद्धतीने ऑक्‍सिजनचे नेमके प्रमाण मोजणे शक्‍य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

अशी होते फसवणूक 

- ऍप्लिकेशन वापरासाठी कॉललॉग, गॅलरी , मॅसेज आणि स्टोरेज परमिशन घेतली जाते. 
- ऑक्‍सिजन पातळी मोजण्यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनर, कॅमेरा, फ्लॅश लाईट चा वापर करण्यास सांगितले जाते. 
- विशिष्ट्य वेळेनंतर मोबाईल स्क्रीनवर काही आकडेवारी येते. 
- ही आकडेवारी प्रमाणित आहे किंवा नाही याची शास्वती नाही. 

काही बनावट अँप्लिकेशन ही निव्वळ फसवणुकीच्या हेतूनेच बनवण्यात आली असतात. अशा ऍप्लिकेशन पासून सावध राहणे गरजेचे आहे. ऍप बाबत खातरजमा करूनच आवश्‍यक माहिती द्यावी. 
सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT