Paddy crop from a tusker elephant in Ajra 
कोल्हापूर

आजऱ्यात टस्कर हत्तीकडून पोटरीत आलेले भातपीक फस्त

रणजीत कालेकर

आजरा कोल्हापूर ः तालुक्‍यात पोटरीला आलेल्या भात पिक टस्कराकडून उध्वस्त केले जात आहे. भात पिकात तुडवून व लोळून टस्कर हत्ती नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. विविध उपाययोजना करून देखील टस्कर बधत नसल्याने वनविभागही हतबल झाला आहे. 
आजरा तालुक्‍यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात, तर जवळपास साठ टक्के क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. शेतकरी विविध प्रकारच्या भाताच्या जातीची लागवड करतात. यंदा देखील शेतकऱ्यांनी देशी वाणासोबत विविध प्रकारच्या कंपन्याच्या भात बियाण्यांची लागवड केली आहे. यंदा पावसाने चांगला हात दिल्याने पिके पोटरीला आली आहेत. पाऊस व हवामान हे दिलासादायक असताना दुसरीकडे दोन जंगली हत्तींनी भात पिक उध्वस्त करण्याचा धडाका लावला आहे. गवसे व आजऱ्याजवळ हे दोन टस्कर वावरत असून भात पिकात रात्रीच्या वेळी उतरून धुडघूस घालत आहेत. पोटरीला आलेली भात पिक टस्करकडून डोळ्यासमोर नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरारले आहेत. टस्करपासून पिके कशी वाचवायची याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. या टस्करावर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाचे पथक कार्यरत आहे, पण दोन टस्करांवर पाळत ठेवताना त्यांच्या नाकी नऊ आले आहे. या दोन दिवसात टस्कराने सोहाळे, गवसे परिसरात भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. 

मनुष्यबळाची कमतरता, साधनांचा अभाव 
वनविभागाकडे जंगली हत्तींना पिकात उतरण्यास रोखण्यास कठीण बनले आहे. या विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ व अत्याधुनिक साधने नाहीत. पारंपारिक उपाययोजनांचा अवलंब करून त्याला पिकातून हाकलण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या हत्तींना रोखण्यासाठी ठोस नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT