painted stork found in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात आढळला दुर्मिळ चित्रबलाक

सुयोग घाटगे

कोल्हापूर : दुर्मिळ होत चाललेला चित्रबलाक किंवा चाम ढोक (पेंटेड स्टॉर्क) नावाने ओळखला जाणारा पक्षी उत्तरेश्वर पेठ येथे जखमी अवस्थेत आढळला. करकोचा कुळातील हा पक्षी. साधारण पाच किलोच्या आसपास वजन असणाऱ्या या चित्रबलाकवर केअर संस्थेत उपचार सुरू आहेत. या पक्ष्याच्या पंखाला गंभीर दुखापत झाली आहे. 


भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमारमध्ये रहिवास करणारा आणि स्थलांतर करणारा हा पक्षी दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेशात आढळतो. पाण्यात उभा राहून मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय वगैरे पाण्यातील जीव खाऊन याची गुजराण होते. या पक्षाच्या शिकारीमुळे हा पक्षी दुर्मिळ होत चालला आहे. पक्षाला केअर संस्थेच्या मिलिंद जगनाडे, राघव सरदेसाई यांनी पकडून उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर संस्थेतील पक्षीतज्ज्ञ गणेश कदम उपचार करत आहे. पाण्यातील किंवा पाण्याजवळील मोठ्या झाडांवर मोठे घरटे बनवतो. एका चित्रबलाकच्या घरट्याला लागूनच दुसऱ्याचे घरटे बांधले जाते. तसेच त्याच झाडावर किंवा परिसरात इतर बगळे, करकोचे आपापली घरटी दाटीवाटीने बांधतात. 


दोन आठवड्यापूर्वी दुर्मिळ काळमांजरचा वावर याच परिसरामध्ये आढळला होता. तर याच परिसरामध्ये चित्रबलाकही आढळला आहे. दोन्हीही घटनांमध्ये हे प्राणी जखमी अवस्थेत रस्त्यावर आढळले आहेत. 

कोल्हापुरातील जैववैविधता येथील पोषक वातावरणाचे प्रतीक आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दुर्मिळ जीव आढळले आहेत. यांचे एकीकडे जतन करण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे येथील अधिवासात या जीवांचा वाढता सहवास हे चांगले संकेत आहेत.
- संयोगिता देसाई-माने, संस्थापिका, केअर

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT