कोल्हापूर

कागलमधील 80 गावांतील पाणंदी होणार अतिक्रमण मुक्त

नरेंद्र बोते

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील  कागल तालुक्‍यातील 80 गावच्या पाणंदी खुल्या करण्याचे काम सध्या सुरू आहे. तीस गावांतील पाणंदी खुल्या झाल्या आहेत. 80 गावांतील 101.2 किलोमीटर लांबीच्या पाणंदी खुल्या होणार आहेत. त्याचा लाभ 7 हजार 615 शेतकऱ्यांना होणार आहे. 
कागल तालुक्‍यात 86 गावे आहेत. त्यातील 80 गावांतील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून खुले करण्याचे काम तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर महिन्यापासून सुरू झाले आहे. 30 गावांतील 40 किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते अतिक्रम मुक्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. वंदूर येथे 4 किलोमीटर व हसूर बुद्रुक येथे साडेतीन किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचा समावेश आहे. काही गावातील पाणंद रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. 
अडचण निर्माण झालेल्या ठिकाणी तडजोडीसाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे, लिपिक सुनील बडद, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यांचे प्रयत्न सुरू आहेत. रोज एका गावातील पाणंद रस्ता मोकळा करणेचे नियोजन करण्यात आले आहे. 


शेतकऱ्यांनी इतरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन अतिक्रमण काढून घ्यावे. पाणंद रस्ते खुले करण्याच्या कामात मदत करून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा.'' 
शिल्पा ठोकडे, तहसीलदार, कागल 

सिद्धनेर्ली गावचा रस्ता अतिक्रमणातून खुला करण्यासाठी तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी लक्ष घातले. त्यामुळे नागरिकांची सोय झाली. गावाच्या प्रगतीत भर पडली. 
- दत्तात्रय पाटील, सरपंच, सिद्धनेर्ली

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT