Panchganga Ghat that keeps you hooked at every moment 
कोल्हापूर

प्रत्येक क्षणी खिळवून ठेवणारा पंचगंगा घाट

उदय गायकवाड

नदीचा घाट सगळ्याच गावांना लाभत नाही. कायम दुथडी भरून वाहणाऱ्या कोल्हापूरच्या  पंचगंगा नदीचे नैसर्गिक रूप दिवसाच्या प्रत्येक क्षणी खिळवून ठेवणारे आणि पर्यटकाला हेवा वाटणारे आहे. हा समृद्धीचा, पर्यावरणाचा ठेवा मौल्यवान वारसा आहे.

 नदीकाठी नागरीकरण झाले ते इसवी सनाच्या आधी दोनशे वर्षे कोल्हापुरातही सुरू झालं ते हे संस्कृती दर्शवणारे पंचगंगा घाट हे ठिकाण आहे. ब्रम्हपुरी टेकडीच्या लगत दोन्ही बाजूला बांधलेला हा घाट आहे. त्याची कागदोपत्री नोंद विद्याशंकर भारती यांनी करवीर पीठाची स्थापना पंचगंगेच्या काठी केली, अशी तेराव्या शतकापासून आढळते. त्यावरून घाट कधी बांधला हे नक्की होते. 
मयुरी नदी म्हणजे आजचा दुधाळी नाला जिथे नदीला मिळतो तो वैष्णव घाट असून तेथे कार्तिक स्वामी व संगमेश्वर तीर्थ होते. आज तेथे बांधकामाचे अवशेष आहेत. त्यानंतर ब्राम्हणांचा घाट असून त्यामागे सिध्देश्वर महाराजांची जिवंत समाधी आहे. तेथूनच शंकराचार्य मठाकडे रस्ता जातो. त्यापुढे आईसाहेबांचा किंवा राजघाट आहे. त्यामागे परकोट असलेला परिसर राजघराण्यातील व्यक्तींसाठी अंत्यसंस्कार करावयाची जागा आहे. 
त्यामध्ये दुसरे संभाजी राजे, आबासाहेब महाराज, शहाजी महाराज यांच्या छत्री आहेत. 1815 मध्ये बांधलेली तिसऱ्या शिवाजी महाराजांच्या छत्रीचे सुंदर कोरीव नक्षीकाम असलेली बांधणी मध्ययुगीन दख्खनी पद्धतीची आहे. त्याच्या ईशान्य कोपऱ्यात तारकेश्वराचे मंदिर आहे. त्याच्या समोरचा घाट तारकेश्वराचा आहे. त्याचा समोर दोन मंदिरे पाण्यात बुडालेली दिसतात. त्यांच्याही पुढे आणखी दोन मंदिरे विहिणींची मंदिरे म्हणून ओळखतात. त्यांच्यामध्ये दोन दीपमाळा आहेत. त्यांच्या समोर अगस्ती व लोपामुद्रा यांचे पाण्यात बुडालेले आणखी एक मंदिर दिसते. त्यापुढे दशाश्व मेघतीर्थ हे ब्रम्हदेवाचे मंदिर, शंकराचे मंदिर असलेले ठिकाण घाटाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे टेकडी लगत आहे. टेकडीच्या किंवा पुलाच्या पलिकडे सर्वतीर्थ आहे. तेथे सर्वेश्वर, नरसिंह, उग्रेश्वर अशी मंदिरे आहेत. त्यापुढे क्षुरकर्म करावयाचा अंत्यजाचा घाट आहे. त्यानंतर जयंती नदी पंचगंगेला मिळतो. मयुरी ते जयंतीच्या दरम्यान हे घाट असून हे प्रत्येक घाट चार टप्प्याचे असून आठ दहा पायऱ्यानंतर सपाट टप्पा, पुन्हा पायऱ्या अशी रचना आहे. 
राजाराम बंधाऱ्यात पाणी अडवल्यानंतर बरीच मंदिरे व घाट पाण्याखाली बुडाला आहे. या घाटाला मंदिरे, दीपमाळा, मूर्ती यांचा साज चढविला आहे. पडझड, गाळ, घाण, निर्माल्य, कपडे धुणे अशा कारणांनी प्रदूषण वाढले आहे. सिरॅमिक टाईल्स, आईल पेंटचा वापर, अनावश्‍यक बांधकाम व बदल यामुळे मूळ सौंदर्य नाहीसे होत आहे. आपणच त्याच्या संरक्षण, संवर्धन करण्याची तयारी दाखवली तर हा वारसा पुढच्या पिढीला पहाता येईल.

करवीर महात्म्य.. 
प्रयागपासून कपिल, शुक्‍ल, विशाल, व्यास, कश्‍यप, गाल व गर्ग, वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्ती, मयुर, तारक, दशाश्व व सर्वतीर्थ अशी तीर्थे क्रमाने थोड्या थोड्या अंतरावर आहेत, असा उल्लेख करवीर महात्मा नुसार आढळतो.

संपादन - यशवंत केस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT