Panel stand on electricity bill in kolhapur
Panel stand on electricity bill in kolhapur 
कोल्हापूर

वीज बिलांवर कोल्हापुरी झटका ; वीज कट करणाऱ्याला तेल लावलेल्या पायताणचा हिसका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - घरगुती वीज बिले न भरण्याचा पवित्रा घेत वीज बिल भरणार नाही कृती समितीने मिरजकर तिकटी येथे उभारलेला फलक चर्चेचा विषय ठरला आहे. सहा महिन्यांचे वीज बिल माफ करा, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळातील वीज मागणाऱ्या सरकारला, वीज कट करणाऱ्याला, जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला, खणखणीत झटका अस्सल कोल्हापुरी तेल लावलेले पायताण, असा आशही फलकावर झळकवला गेला आहे. 

कोरोना काळातील वीज बिल भरमसाठ आल्याने वीज ग्राहकांत संतप्त भावना आहेत. सर्वपक्षीय कृती समितीने वीज बिलांविरोधात आंदोलने, निदर्शने करत महावितरणला टाळे ठोकले. घरगुती वीज बिले शासनाने मान्य करावीत, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मिरजकर तिकटीला वीज बिल भरणार नसल्याचा फलक उभारला आहे. वीज बिल वसुलीसाठी कोणी आले तर त्याला कोणत्या भाषेत उत्तर दिले जाईल, याचा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे संपर्कासाठी समितीतील कार्यकर्त्यांचे नंबरही झळकले आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT