भोगाव (ता. पन्हाळा) गावांच्या हद्दीवर दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला.  SAKAL
कोल्हापूर

पन्हाळा : दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

पोहाळे तर्फ बोरगावजवळ घटना; शेतीचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

बाजार भोगाव : पोहाळे तर्फ बोरगाव व बाजार भोगाव (ता. पन्हाळा) गावांच्या हद्दीवर दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला. गव्यांच्या झुंजीत सुमारे पाच गुंठ्यातील उसाची नासाडी झाली. याबाबत घटनास्थळ व बाजार भोगाव परिमंडळ वन अधिकारी नाथाजी पाटील यांनी दिलेली माहिती अशी : गव्यांचा कळप पोहाळे तर्फ बोरगाव व बाजार भोगाव हद्दीवरील पाय वाटेने गाव शिवारामध्ये येत होता. वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने दोन गव्यांची झुंज सुरू झाली. झुंज करत दोन्ही गवे आनंदा गणपती पाटील (रा. पोहाळे तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा) यांच्या ‘शिव’ नावाच्या  उसाच्या शेतात आले. दोन्ही गव्यामध्ये तुंबळ झुंज झाली. तेथूनच दोन्ही गवे तानाजी पाटील यांच्या शेतात पोहोचले.  झुंजीमुळे दोन्ही शेतातील सुमारे पाच गुंठ्यातील ऊसाची नासाडी झाली. अखेर या दोन गव्यांच्या झुंजीत दमलेल्या एका गव्याचा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. आज सकाळी शेतीकामासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युमुखी पडलेला गवा दिसला. त्यांनी वनकर्मचाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली. 

बाजार भोगावचे परिमंडळ वन अधिकारी नाथा पाटील, वनरक्षक कुंडलिक कांबळे, महादेव कुंभार, संगीता देसाई, वनमजूर बाळू म्हामुलकर, नाथा पाटील, यशवंत पाटील, शंकर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत गव्याच्या अंगावर शिंगे लागल्याच्या खुणा आढळल्या.दरम्यान, मृत गव्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रानभरे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत गव्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने दोन बलाढ्य गव्यांमध्ये मोठी झुंज झाली. त्यात दमलेल्या गव्याची हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याचे अनुमान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढले आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.

... नाथाजी पाटील, वनपाल, बाजार भोगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT