Panhalagad will be open for tourists from Thursday? 
कोल्हापूर

पन्हाळागडावर गुरुवापासून पर्यटकांसाठी प्रवेश खुला होणार?

राजेंद्र दळवी


आपटी,कोल्हापूर ः कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे गेली सात महिने पन्हाळगड पर्यटकांसाठी बंद आहे. मुळातच गडावरील व्यवसाय व त्यांचे अर्थकारण हे पर्यटकांवर अवलंबून आहे. जवळपास सात महिने गडावर पर्यटकच नसल्याने सत्तर टक्के व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पन्हाळागड पर्यटकांसाठी लवकर खुला करावा, अशा मागणीचे निवेदन गडावरील व्यावसायिकांनी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना दिले होते. त्या अनुषंगाने व्यावसायिक व नगरपरिषद प्रशासन यांच्यामध्ये आज बैठक झाली. एक आक्‍टोबरपासून पर्यटकांसाठी गड खुला करणेबाबत पन्हाळा उपविभागीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी दिले. 
मुळातच पन्हाळगडावर कोणताही मोठा उद्योग वा कारखाना नाही. गडावर चालू असलेल्या छोटे व्यवसायांपैकी जवळपास सत्तर ते ऐशीं टक्के व्यवसाय हे निवळ पर्यटकांवर अवलंबून आहेत. मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने चार महिने पन्हाळगड पूर्णपणे बंद होता. त्यातून गडावरील व्यावसायिक सावरतो ना सावरतो तोच यावर्षीच्या सुरवातीपासूनच कोरोनामुळे पन्हाळा गड पर्यटनासाठी बंद झाला. याचा सर्वात मोठा फटका व्यावसायिकांना बसला. इथले सर्वच व्यवसाय बंद पडले. व्यावसायिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गडावरील व्यावसायिकांनी पन्हाळागड पर्यटकांसाठी खुला करावा, अशा मागणीचे निवेदन 
मुख्याधिकारी खारगे व नगराध्यक्षा रुपाली धडेल यांना दिले होते. त्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत सर्व बाबींचा विचार करून धडेल व खरगे यांनी पर्यटन चालू करावयाचे असेल तर वेळेचे बंधन, सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर तसेच खाद्यपदार्थ पार्सल स्वरूपात देणे यासारख्या शासनाने घातलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले व 
पन्हाळागड एक आक्‍टोबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्याबाबत पन्हाळा उपविभागीय अधिकाऱ्यांचे सल्ला घेणेचे आश्वासन व्यावसायिकांना दिले. यावेळी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, रवींद्र धडेल, संग्रमसिंह भोसले, सतीश भोसले, प्रवीण शिंदे, मिलिंद कुराडे, मंदार नायकवडी, मारुती माने, यांच्यासह गडावरील सर्व व्यावसायिक उपस्थित होते. 

व्यावसायिकांकडून आनंद व्यक्त 
मुख्याधिकाऱ्यांच्या आश्‍वासनामुळे पन्हाळागड एक आक्‍टोंबर पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गडावरील थंडावलेल्या अर्थकारणाला यामुळे गती मिळणार असल्याने, या निर्णयाने पन्हाळा गडावरील सर्व व्यावसायिकांकडून आनंद व्यक्त होत आहे. 

-संपादन यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: शेअर बाजारानंतर सोन्याचे भावही घसरले! दसऱ्याआधी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; पाहा ताजा भाव

Omraje Nimbalkar Viral Video : राणा जगजितसिंह यांना पाहून खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसताना अचानक मागे फिरले?, व्हायरल व्हिडिओ

Mumbai Pune Expressway Bus Fire : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला अचानक आग; मोठी दुर्घटना टळली, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार लवकर मिळणार

Team India : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाला, शुभमन...

SCROLL FOR NEXT