Panic in Shirol taluka due to Corona suspect girl 
कोल्हापूर

कोरोना संशयित युवती मुळे शिरोळ तालुक्यात घबराहट...

सकाळवृत्तसेवा

शिरोळ (कोल्हापूर) - शिरोळ येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या, एका कुटुंबातील 21 वर्षे युवतीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युवतीचे घशातील स्त्राव घेण्यात आले आहेत. युवतीचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तिला कोरोना ची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. तथापि शिरोळ सह परिसरातील गावांमध्ये घटनेमुळे घबराट पसरली आहे.

तालुक्यातील एका गावातील कुटुंब, शिरोळ येथील, एका उपनगरात  भाड्याने राहत आहे. कुटुंबातील एक युवती पुणे येथे नोकरी होती. कोरोना च्या पार्श्वभूमीवर युवती आपल्या घरी आली होती. गेली तीस दिवस घरातच ती होम कोरंटाईन होती. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास या युवतीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, म्हणून तिला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. येथील  डॉक्‍टरांनी युवतीला उपचाराकरिता मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.

ही बातमी आज सकाळी शिरोळमध्ये वाऱ्यासारखी पसरली. शिरोळ मध्ये कोरोना चा संशयित रुग्ण सापडल्याची बातमी, संपूर्ण तालुक्यात पसरली.   युवतीचे घशातील स्त्राव वैद्यकीय चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच, संबंधित युवतीला, कोरोना ची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT