Paper examination of English subject will be done district wise In belgum 
कोल्हापूर

इंग्रजी विषयाची पेपर तपासणी होणार जिल्हानिहाय....

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बारावीचा निकाल लवकर लागावा यासाठी इंग्रजी विषयाची पेपर तपासणी जिल्हानिहाय करण्याचा निर्णय पदवीपुर्व शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे मुल्यमापकांमधुन समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे. बारावीचा शेवटचा पेपर गुरुवारी होणार आहे. त्यानंतर सोमवारपासुन जिल्हानिहाय पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जिल्हानिहाय पेपर तपासणी करावी अशी मागणी प्राध्यापकांनी लावुन धरली होती मात्र शिक्षण खात्याने मे महिनाच्या शेवटच्या आठवड्‌यापासुन बारावीच्या पेपर तपासणी हाती घेतले होते. तसेच बेळगावसह राज्यातील आठ पेपर तपासणी केंद्रावर मुल्यमापनाचे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला अनेक प्राध्यापकांनी मुल्यमापकांनी पेपर तपासणीकडे पाठ फिरविली होती मात्र त्यानंतर 70 टक्‍के प्राध्यापक मुल्यमापनासाठी हजर झाले. त्यामुळे सध्या मुल्यमापनाचे काम शेवटच्या टप्पात असुन शुक्रवारपर्यंत पेपर तपासणीचे काम पुर्ण होणार आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरानाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शेवटच्या इंग्रजी विषयाची पेपर तपासणी जिल्हानिहाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात होती. तसेच राज्यातील विविध पक्षांच्या शिक्षक प्रतिनिधी आमदारांनीही शिक्षण मंत्र्याची भेट घेऊन जिल्हानिहाय पेपर तपासणी करावी अशी विनंती केली होती. गुरुवारी इंग्रजी विषयाचा पेपर पुर्ण झाल्यानंतर राज्यातील सर्व पदवीपुर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी उत्तर पत्रिका पदवीपुर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात आणण्याची जबाबदारी घ्यावी अशी सुचना करण्यात आली असुन कोणत्याही परिस्थितीत दुचाकीवरुन उत्तर न आणता चार चाकी वाहनातुनच उत्तर पत्रिका आणाव्यात असे स्पष्ट करण्यात आले असुन त्यानंतर पेपर तपासणी केंद्रावर उत्तर पाठविल्या जाणार आहे.जिल्हानिहाय पेपर तपासणी केल्यामुळे इंग्रजी विषयाच्या पेपर तपासणीचे काम लवकर पुर्ण होणार असुन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्‌यात निकाल लवकर लागण्यास मदत होईल असे मत शिक्षण खात्यामधुन व्यक्‍त होत आहे.
 

प्राध्यापक संघटनेने सुरुवातीपासुनच जिल्हानिहाय पेपर तपासणी करण्याची मागणी केली होती मात्र याकडे शिक्षण खात्याने दुर्लक्ष केले होते.आता संघटनेच्या मागणीनुसार जिल्हानिहाय पेपर तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे स्वागत आहे.
रवि शंकर मठ, अध्यक्ष बेळगाव जिल्हा पदवीपुर्व प्राध्यापक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT