Parents and students are being pressured to get admission only after paying private school fees 
कोल्हापूर

फी भरा तरच प्रवेश पत्र देतो ; खाजगी शाळांकडुन मनमानी...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - दहावीची परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत. मात्र शहरातील काही खाजगी माध्यमांच्या, शाळा शुल्क भरा तरच प्रवेश पत्र दिले जाईल असा दबाब पालक व विद्यार्थ्यांवर करीत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांची चिंता वाढली असुन शिक्षण खात्याने याकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासुन शहरातील अनेक खासगी शाळा पालकांना वार्षिक शुल्क शुल्क भरा असे सांगत त्यांच्यावर दबाव टाकीत आहेत त्यामुळे पालकांमधुन मोठ्‌या प्रमाणात नाराजी व्यक्‍त होत असतानाच दहावी परीक्षेच्या तोंडावर शिल्लक राहिलेले शुल्क भरा तरच विद्यार्थ्याना प्रवेश पत्र उपलब्ध करुन दिले जाईल असे सांगत आहेत. काही पालकांनी थोडी रक्‍कम आता भरतो व उर्वरीत रक्‍कम नंतर देतो असे सांगुन देखिल काही शाळांनी शुल्क भरा तरच प्रवेश पत्र देतो असे अशी भुमिका घेतल्याने अनेक पालकांची परवड होत आहे.

कोरानाच्या संकटामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासाठी शिक्षण खात्याने पालकांवर वार्षिक शुल्क भरण्यासाठी दबाव घालू नये,अशी सूचना शिक्षण खात्याकडुन अनेकदा करण्यात आली आहे. तरीही खासगी शाळांकडून प्रवेश पत्र उपलब्ध करुन देतानाही शुल्क वसुली केली जात आहे. दरवर्षी परीक्षे आधी शिल्लक रक्‍कम भरुन घेतली जाते. मात्र यावेळी लॉकडाउनमुळे अनेक व्यवहार बंद राहिल्याने काही पालकांना शुल्क भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे काही पालकांनी शुल्क भरण्यासाठी एक-दोन महिन्याची सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तरीही काही शाळांनी पूर्ण शुल्क भरण्याचा तगादा पालकांकडे लावला आहे. त्यामुळे शुल्क भरले नाही तर प्रवेश पत्र मिळेल की नाही या चिंतेत सध्या काही पालक अडकले आहेत. शिक्षण खात्याच्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ज्या शाळा पालकांना शुल्क भरा असे सांगत आहेत. त्या शाळांना तातडीने सूचना करुन शुल्क वसुलीची सक्‍ती रोखावी अशी मागणी करण्यात येत आहे.
 

कोणतीही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र रोखु शकत नाही यावेळी कोरोनाचे संकट असल्याने सर्व शाळांना शुल्क भरण्यासाठी दबाब न टाकण्याची सूचना केली आहे याचे पालन होणे आवश्‍यक आहे. सर्व शाळांनी वेळेत विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश पत्र उपलब्ध देणे आवश्‍यक आहे.
ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT