parents as bodyguard for daughter in kolhapur fear of crime case
parents as bodyguard for daughter in kolhapur fear of crime case 
कोल्हापूर

टवाळखोरांच्या धास्तीमुळे पालकच बनले मुलींचे बॉडीगार्ड

राजेश मोरे

कोल्हापूर : आपल्या मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी सध्या पालक बॉडीगार्ड म्हणून बजावत आहेत. मुलींना शाळेत सोडणे व घरी घेऊन जाण्याची नवी ड्यूटी त्यांच्या अंगवळणी पडली आहे. शाळा परिसरातील टवाळखोरांच्या हाणामाऱ्यांची धास्ती, तर वाहतूक कोंडीने अपघाताची भीती त्यांच्या मनात घर करू 
लागली आहे. 

मुले शिकून मोठी व्हावीत, याच अपेक्षेने पालक मुलांच्या शिक्षणाला अधिक महत्त्व देतात. मुलांना बालवाडीपासून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पालकांचा प्रयत्न सुरू झाला. ते घरापासून दूरवरच्या शाळेत मुलांना पाठवू लागले. यापूर्वी मुले सायकल, बस अगर रिक्षातून एकटी अगर मित्र-मैत्रिणींसोबत जात-येत होती; पण आज परिस्थिती बदलली आहे. 
बहुसंख्य पालक पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी व घरी घेऊन जाण्यासाठी ये-जा करू लागलेत. यात मुलींच्या पालकांची संख्या अधिक आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. 

आज काही मुलींच्या शाळा परिसरात टवाळखोरांची टोळकी वाढत आहेत. शाळा सुटण्याच्या अगर भरण्याच्या वेळेला या टोळक्‍यात भर पडते. त्यांच्या भिरभिरणाऱ्या नजरा, इंप्रेशनसाठी धूम स्टाईलने मोटारसायकल चालविण्याचा प्रताप आणि वारंवार घडणाऱ्या हाणामाऱ्यांच्या प्रकाराची पालकांच्या मनात धास्ती बसली आहे. 

न्यू महाद्वाररोड परिसरात चार दिवसांपूर्वी दुपारी शाळा सुटल्यानंतर याचा अनुभव काही पालकांनी घेतला. 
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अनेक शाळा आहेत. या शाळा भरण्याच्या अगर सुटण्याच्या वेळेला परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होते. ही कोंडी जरी काहीकाळ असली तरी शाळेतील मुलांना त्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते. याच कारणांनी अनेक पालक हे मुलींचे बॉडीगार्ड बनले आहेत.

पालकांना हे अपेक्षित

  •  मुलींच्या शाळा परिसरात घाला गस्त 
  •  टवाळखोरांचा बंदोबस्त करावा
  •  शाळा परिसरातील वाहतुकीला शिस्त लावा
  •  बेदकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर करा   कारवाई 
  •  विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घ्या

"शाळा परिसरातील टवाळखोरांचा वावर, त्यांच्यातील हाणामारीचे प्रकार धडकी भरवतात. मुलगी लहान असली तरी तिला दररोज शाळेत सोडण्यासाठी व आणण्यासाठी काळजीपोटी आम्ही जातो."

- प्रवीण भोसले, पालक

"शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होते. या कोंडीच्या भीतीपोटी मुलीला दररोज शाळेत सोडणे व आणण्यासाठी जावेच लागते."

 - मिलन मुळीक, पालक

"शाळा परिसरात जर टवाळखोर निदर्शनास आल्यास त्यांना थेट लॉकपमध्ये पाठवू. याबाबत तक्रार देण्यासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावा."

- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT