Patents for making human organs based on stem cells; Dr. Research by Meghnad Joshi 
कोल्हापूर

मूळ पेशींचा आधार घेत मानवी  अवयव बनविण्याचे पेटंट ; डॉ. मेघनाद जोशी यांचे संशोधन

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर : शरीराचा एखादा अवयव निकामी झाला, की उपचार खुंटतात आणि अवयव प्रत्यारोपणाची आवश्‍यकता भासते. असा अवयव दुसऱ्या व्यक्तीचा मिळवणे व तो गंभीर अवस्थेतील रुग्णांना प्रत्यारोपित करणे व त्या रुग्णाच्या शरीराशी जुळून येणे, हे कमालीचे कठीण व खर्चिक काम. यावर पर्याय कोल्हापूरच्या डॉ. मेघनाद जोशी यांनी शोधला आहे. मूळ पेशींचा आधार घेऊन मानवी अवयव बनविण्यात त्यांनी संशोधन केले आहे. त्यांचे हे संशोधन अतिगंभीर रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. 
डॉ. जोशी ताराबाई पार्क येथे राहतात. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठात झाले. लिव्हर रिजनरेशन या विषयात त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्वीडन येथील कॅरोलिन्स्का विद्यापीठात फिटल हिपॅटोसाईटस ट्रान्सप्लांट या विषयावरपोस्ट डॉक्‍टरल संशोधन सुरू केले. त्यानंतर गॉथेनबर्ग युनिव्हर्सिटी, सॉल्ग्रेरन्स्का हॉस्पिटल येथे टिश्‍यू इंजिनिअरिंग विषयात संशोधन करत असताना त्यांनी मूळ पेशींपासून अवयव संशोधनाचा पहिला प्रयोग यशस्वी केला. ज्या रुग्णांच्या स्वतःच्या नाकातून व बोन मॅरोमधील मूळ पेशी संकलित करून श्‍वासनलिका तयार केली. टिश्‍यू इंजिनिअरिंगमधील त्यांनी संशोधनाबद्दल त्यांना सहा पेटंट दाखल केले आहेत. 

2011 ला ते भारतात परत आले. काही काळ पुण्यात लॅब डायरेक्‍टर म्हणून काम केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्टेमसेल ऍण्ड रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. चार वर्षे त्यांनी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. येथील प्रयोगशाळेत ते टिश्‍यू इंजिनिअरिंग संशोधनात त्वचा, धमण्या व इतर अवयव पेशींच्या आधाराने तयार केले जातात. प्रयोगशाळेत थ्रिडी पेटिंग टेक्‍नॉलॉजीचा वापर करून त्वचा व कान यांची निर्मितीही केली आहे. दरम्यान, त्यांना कर्करोगावरील निदान पद्धतीबाबत भारत सरकारच्या सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी विभागाचा एक प्रोजेक्‍ट मिळाला होता. 

ही आहेत पेटंट 
- प्रिपरेशन ऑफ नॅनो पॉलिमर फॉर द ट्रिटमेंट ऑफ नॉन हिलिंग ऍण्ड डायबेटिक वाऊंडस ऍण्ड टिश्‍यू इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन 
- सिंथेसिस प्रोसेस ऑफ कंपोसिट आर्टिफिशियल स्किन बायोनेक फॉर थ्रिडी बायोप्रिंटिंग ऍण्ड वाऊंड हिलिंग ऍप्लिकेशन 
- मेथड ऑफ कन्स्ट्रक्‍टिंग टिश्‍यू इंजिनिअरिंग ह्युमन इअर पिना प्रोसथेसिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT