Patrols will increase in Kolhapur city on the backdrop of municipal elections 
कोल्हापूर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर शहरात गस्त वाढणार

राजेश मोरे

कोल्हापूर ः महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत झाल्यानंतर इच्छुकांच्या मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तशी प्रभागात तरूणांची टोळकी वाढू लागली आहेत. निवडणुकीतील इर्षा, संघर्षातून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात पेट्रोलिंग वाढविण्याचे आदेश दिले आहेत, असे शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
महानगरपालिकांना निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर तर इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा निमित्त्यांने अशा इच्छुकांच्या फलकांची गर्दी झाली आहे. सायंकाळनंतर शहर परिसरात टोळक्‍यांचीही संख्या वाढू लागली आहे. चर्चेतून टोळक्‍यांत इर्ष्या, संघर्ष निर्माण होण्याची व त्यातून हामामाऱ्यासारखे प्रकार घडण्याचे धोके वाढू लागले आहेत. शहर पोलिस उप-अधीक्षक चव्हाण यांनी गैरप्रकारावर अंकूश ठेवण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी शहरातील चारही पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना हद्दीतील पेट्रोलिंग (गस्त) वाढण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीच्या निवडणूक काळात वाद, मारामारीसारखे प्रसंग घडले आहेत, अशा ठराविक भागात विशेष लक्ष ठेवा, रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या खुल्या पार्ट्या, ओपन बार, अवैध धंद्यासह रेकॉर्डवरील, स्थानबद्ध, हद्‌पार केलेल्या गुन्हेगारांवर वेळीच कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार सायंकाळनंतर हद्दीतील गस्त वाढविण्यावर भर देण्यास पोलिस ठाण्यांनी सुरवात केली आहे. त्यांच्याकडून या गस्तीचा आणि त्या अनुसरून केलेलया कारवाईचा दररोज आढावा घेतला जाणार आहे. 

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी शहरात गस्तीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
- मंगेश चव्हाण, शहर पोलिस उप-अधीक्षक.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT