kolhpaur  esakal
कोल्हापूर

पट्टणकोडोली - यंदा राज्यात भरपूर पाऊस; 'विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणूक

आज सकाळी परंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरवात झाली. मानाच्या दुधारी तलवारींचे गावच्या वाडीत पुजन करण्यात आले.

सचिनकुमार शिंदे

आज सकाळी परंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरवात झाली. मानाच्या दुधारी तलवारींचे गावच्या वाडीत पुजन करण्यात आले.

पट्टणकोडोली - 'विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं'चा गजर करत मोठ्या भक्तीमय वातावरणात पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री. विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला. आज सकाळी परंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरवात झाली. मानाच्या दुधारी तलवारींचे गावच्या वाडीत पुजन करण्यात आले. प्रकाश पाटील रणजित पाटील, श्री. जोशी, श्री. आवटे, श्री. गावडे, श्री. कुलकर्णी, श्री. चौगुले आदी मानकरी आणि धनगर समाज पंच मंडळींनी फरांडेबाबांना भेटून मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले.

हे निमंत्रणं स्विकारुन फरांडेबाबा मानाच्या दगडी गादीवरुन उठले. फरांडेबाबांनी हेडाम नृत्य केले. यावेळी जमलेल्यांनी त्यांच्या अंगावर भंडारा, खारिक-खोबरे, बाळ लोकर यांची उधळण केली. टनाच्या हिशोबात पडणारा भंडारा यंदाही कोरोनामुळे थांबला असे वाटत असताना फरांडेबाबांच्या हेडामवेळी भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या प्रचंड उधळणीने आसमंत पिवळा धमक झाला होता.

या यात्रेत सात दिवसात पाऊस पडेल. रोहिणीचा पाउस, मृगाचा पेरा होईल. खळ्याकाठी दोन सव्वा दोन पिकेलं. तांबड धान्य कडक होईल. कानानं ऐकालं पण डोळ्यांनी पहाणार नाही अशी रोगराई संदर्भातील तर माझी सेवा करशीला तर खाशीला मेवा, कांबळ्याखाली घेईन, अशी भाकणूक केली आहे.

दरम्यान कोणतीही प्रकारची दुकाने, खेळणी-पाळणे यांना बंदी घातल्यानं गोंधळ थांबला होता. भाविकांनी रात्रभर धनगरी ओव्यांचे कार्यक्रम चालु ठेवले होते. मंदिर परिसरा भोवती बॅरिकेट्स लावून पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे. भाविकांनाही दर्शन रांगेतून दर्शनासाठी सोडण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT