कोल्हापूर

शांतता, स्वयंशिस्तीचा लॉकडाउन! 

बी.डी.चेचर

कोल्हापूर : कोरोनाच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन केला. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता नागरिक घराबाहेर न पडल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता जिल्ह्यात शुकशुकाट आहे. 


दोन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये शहर आणि जिल्हाभर नागरिकांवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. सहज फिरणाऱ्या नागरिकांची हजारो दुचाकी वाहने जप्त केली. मात्र, सध्याचे चित्र पाहता भीतीपोटी कोणीही बाहेर पडत नाहीत. दूध संकलन आणि खरेदी यासाठीच बाहेर पडतात. बुधवारी सकाळी कोल्हापूर आणि काही ग्रामीण भागाची पाहाणी करताना बांबवडे, मलकापूर, आंबा, विशाळगड, येळवण जुगाई, अणुस्कुरा, करंजफेण, बाजारभोगाव, कळे व त्याशेजारील सर्व छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांत शुकशुकाट होता. महत्वाच्या गावाच्या वेशीवर पोलिसांनी सर्व वाहनांना गावबंदीसाठी बरॅकेट्‌स लावून तेथे पोलिस फौजफाटा तैनात ठेवलेला आहे. परंतू ऍब्युलन्स, दूधाचे टॅंकर, मेडीकल ,डॉक्‍टर यांना परवानगी होती. गावागावातून जाताना लोक घरातच होते . डोंगरात हिरवळीवर जनावरे चरताना दिसत होती. ज्या मार्गावरुन फेरफटका मारला त्या महत्वाचे सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत होते. 


कोरोनाची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने घेतलेला लॉकडाउनच्या निर्णय चांगला आहे, शेतीची कामे थोडी बाकी आहेत मात्र लॉकडाउन झाल्यानंतर च कामे केली जातील. 
- संजय पवार, मलकापूर 

याकडेही लक्ष हवे... 
जिल्ह्यात लॉकडाऊन असला आणि सर्वजण घरीच असले तरी अतिउत्साही तरूणांकडून मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येणे आणि झालेल्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंड आहे. त्याशिवाय लग्न व इतर काही विधीवेळीही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. मात्र, केवळ लॉकडाऊन झाला आणि घरीच थांबले म्हणजे कोरोना येणार नाही, ही भावना असली तरी काही अतिउत्साही लोकांमुळे धोका पसरू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: तळेगावात रस्त्याच्या मधूनच उसळला पाण्याचा प्रचंड फवारा... सर्व भयभीत... थरारक अन् अचंबित करणारा प्रकार

पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या नातवाचे कांड, परदेशी महिलांच्या व्हिसाची सोय केली, देशात येताच अपहरण अन् अत्याचार

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

IND vs ENG: 'त्या एका षटकाने सामना फिरला'; पराभवानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य, रवी बिश्नोईबाबत काय म्हणाला?

Ayodhya Ram Mandir: राममंदिरासाठी ‘सीईओं’ची नियुक्ती शक्य; ट्रस्टची सोमवारी बैठक; ‘एसआयटी’ अहवालावरही चर्चा

SCROLL FOR NEXT