people attack on MSEDCL employee in ichalkaranji morning in kolhapur 
कोल्हापूर

महावितरणच्या कर्मचाऱ्यावर वीज ग्राहकांचा हल्ला; इचलकरंजीतील घटना

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : विजबिल माफीवरून वीज ग्राहक आणि महावितरण कंपनी यांमध्ये मोठा संघर्ष सुरू असताना एका महावितरण कर्मचाऱ्यावर वीज ग्राहकांनी हल्ला केल्याची घटना घडली. युवराज माळी असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आवळे गल्लीत महावितरण विभागातील झोन 'अ' मधील  काही कर्मचारी वीज तोडणीसाठी गेले. यावेळी चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ महावितरण कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र येत गावभाग पोलिसात जमले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम गावभाग पोलिसात सुरू आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास महावितरणचे कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी आवळे गल्लीत गेले होते. त्यावेळेला वीजबिल वसुलीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात कर्मचारी जखमी झाला. त्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वीज बिलाबाबत महावितरण कार्यालयनंतर आता महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. त्यामुळे महावितरण कर्मचारी एकत्र येत गावभाग पोलिसात जमले. 'आम्हाला न्याय द्या' अशी मागणी करत हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT