People do not need to sound stunted kolhapur marathi news 
कोल्हापूर

स्टंटबाजीच्या नादाला लोक लागत नाहीत 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः जिल्ह्यातील शेतकरी स्वाभिमानी आहे. सर्वाधिक कर्जाची परतफेड करणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे कर्जमाफी मिळावी म्हणून येथील शेतकरी कधीच रक्‍ताने पत्र लिहीत नाहीत तसेच कर्जमाफीसाठी स्टंटबाजी करणाऱ्यांच्या नादालाही ते लागत नाहीत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता लावला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगत त्यांनी तोंडभर कौतुक केले. जिल्हा परिषदेकडील अनुकंपावरील 9 उमेदवारांना नियुक्तीचे आदेशही मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते वितरीत केले.

ते म्हणाले, ""राज्याचा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना समावून घेणारा व सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असून 2 लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी 2 लाखांवरील रक्कम भरल्यास 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.'' 

प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कोल्हापूरात होत असलेल्या महिला दिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची माहिती दिली. प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांनी आभार मानले. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, प्रियदर्शनी मोरे, राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. 

पूरग्रस्त निधीची प्रक्रिया सुरू 
जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईचा 168 कोटीचा तर 2 लाखांप्रमाणे कर्जमाफीचा 85 कोटीचा निधी जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झाला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya : मल्ल्याने म्हटलं बँकांनी जास्त पैसे वसूल केले, पण SBIच्या प्रतिज्ञापत्रात वेगळाच दावा; ८,७५२ कोटी बाकी, पुढे काय होणार?

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT