People from Karnataka border are banned from entering Maharashtra 
कोल्हापूर

सीमाभागाला कोरोनाने केलं महाराष्ट्रापासून पोरकं...

अनिल पाटील

कोगनोळी - महाराष्ट्राकडून कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांवर दावा सांगितला जातो. त्यानुसार विविध सोयी-सुविधा व योजनांचा लाभ मिळतो. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावातील लोकांचा महाराष्ट्रातील अधिकारी व प्रशासनला विसर पडला आहे. कर्नाटक राज्याच्या तोडीसतोड बंदोबस्त देत या गावातील लोकांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी करुन पोरके केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सीमाभागात नाराजी पसरली आहे.

येथील कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला आहे. तेथे सीमाभागातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जाते. निपाणी सीमाभागातील लोकांचा कायम संपर्क महाराष्ट्रातील कागल, कोल्हापूर येथे येतो. पण सध्या रुग्ण वगळता अन्य कोणाला महाराष्ट्रात जाणे बंद केले आहे. तर कागल नगरपालिकेने व्यापाऱ्यांना येण्यास बंदी घातली आहे.

एरव्ही सीमाभागातील लोक कर्नाटक जन्मभूमी तर महाराष्ट्र कर्मभूमी मानतात. पण आता कर्मभूमीत जाणे अवघड झाले आहे. सीमाभागातील व्यापारीवर्गाचा महाराष्ट्रातील कागल, कोल्हापूर येथे संपर्क असतो. यातून उधारी, उसनवारी व्यवहार चालत असतो. राज्यबंदी झाल्याने येथील व्यापाऱ्यांना निपाणीला जाऊन रोखीने बाजार आणावा लागत आहे. त्यामुळे काही वस्तू महागात विकाव्या लागत आहेत.

महाराष्ट्राने मुभा देण्याची मागणी

सीमाभागातील नागरिकांचा महाराष्ट्रात नेहमीच संपर्क असतो. शेतीशी निगडित व अन्य महत्त्वाच्या कामासाठी मुभा मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
 

'किराणामाल व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी नेहमी कागलला जातो. पण सध्या राज्यबंदीमुळे जाणे अवघड झाले आहे.'
- भुषण पाटील,
दुकानदार, कोगनोळी
 

'सीमाभागातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील कागल, हुपरी साखर कारखान्यांशी संपर्क येतो. शेतीसाठी खतासह अन्य साहित्य खरेदीसाठी महाराष्ट्रात जावे लागते. पण राज्यबंदी कामांचा खोळंबा होत आहे.'
- बाळासाहेब बाळीकाई, शेतकरी, कोगनोळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road BMW Accident : फ्लायओव्हरवरून थेट खाली कोसळली कार, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा जागीच मृत्यू; काय घडलं?

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : शिरूर गोळीबाराची घटना ताजी असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून तरूणावर जीवघेणा हल्ला

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT