people In a village far from the city safe from corona radhanagari kolhapur 
कोल्हापूर

इथं कोरोना नाही ; इथे फक्त आम्ही अन् आमचा निसर्ग...

राजू पाटील

राशिवडे (कोल्हापूर) - राधानगरी तालुक्यातील किलचा हा परिसर राधानगरी आणि गगणबावडा तालुक्याच्या मध्यावर असलेला उंच रमणीय परिसर. आजूबाजूला अनेक छोट्या वाड्या जंगलामध्ये दडलेल्या आहे. त्यापैकी एक हणबरवाडी. इथले नागरिक सध्या आपल्या रोजच्या आणि पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनामध्ये गुंतले आहेत. कोरोनाची भीतीच नाही. शहरापासून कोसो दूर असलेल्या या वाडीमध्ये लोक निसर्गाच्या सानिध्यात सुखात आहेत.

तुळशी धरणा पासून साधारण दहा किलोमीटरवर आणि केळशी बुद्रुक या गावापासून साडेतीन किलोमीटरवर उंच जंगलात किलचा परिसर आहे. धरणाच्या परिसरातून पश्चिमेकडे हा किल्ल्यासारखा भाग सहज लक्ष वेधून घेतो. याच परिसरात हणबरवाडी मालपवाडी, पिलारवाडी अशा छोट्या छोट्या वाड्या वसलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेचा भाग गगनबावडा तालुक्यात येतो आणि पूर्वेकडचा भाग राधानगरी तालुक्यातील.कोरोना इथे माहिती जरी असला तरी भीती मात्र कुणालाच नाही.

वाडीतील अनेक मुंबईला चाकरमाने आहेत पण गुढीपाडव्या पूर्वी शिमग्याला उत्सवासाठी आल्याने कशाची भीती नाही. जे आहेत ते मुंबईतून परत येण्याची परिस्थिती नाही, येणारही नाहीत. त्यामुळे त्याची लागण होईल ही तिळमात्रही शंका लोकांना नाही. तरीही कोरोनाचे नियम पाळले जातात. या लोकांचा संपर्क बाहेरच्या लोकांशी गेल्या दोन महिन्यापासून नाही. पावसाळ्यापर्यंत आपल्याला हवी तशी तजवीज करून ठेवलेली आहे.

बिनधास्तपणे कोरोनापासून भयमुक्त

आता येथील लोक पावसाळ्यात आणि त्या पावसाला तोंड देण्यासाठी तयारीला लागले आहेत. परसातील छ्परात लाकूडफाटा चांगला बंदिस्त करून ठेवला जात आहे.  शेत शिवारात खरीपासाठी शेत भाजणीच्या कामात आणि पावसाळ्यासाठी वैरण जमा करून घर भरण्यासाठी त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू आहे. तसं दिडशे ते दोनशे लोक वस्तीची ही छोटी वाडी. आज बिनधास्तपणे कोरोनापासून भयमुक्त आहे. रोजचा व्यवहार आणि निसर्गाच्या सानिध्यात जंगलाच्या परिसरात मस्त आहे. परिसरात असलेल्या पक्षांच्या किलबिलाटात आनंदात जगत आहेत.

आम्ही आहोत आणि आमचा निसर्ग

कोरोना आमच्यापर्यंत पोचणारच नाही, आम्ही शहरापासून कोसो दूर आहोत, आम्हाला कशाची भीती नाही. आम्ही आहोत आणि आमचा निसर्ग आहे. अशी भावना येथील शामराव जरंडे यांनी व्यक्त केली. ते आज पावसाळ्यासाठी कोंबड्यांना डाळगे बनवण्यात व्यस्त होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT