Permission within the district boundaries for restricted agricultural work 
कोल्हापूर

रखडलेल्या शेती कामासाठी  जिल्हा सीमांमध्ये परवानगी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सीमाभागात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्याची मुभा दिली जाणार आहे.  जिल्ह्यातील सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमाभागातील शेतीची रखडलेली कामे शेतकऱ्यांना करता येणार आहेत. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी काळात जिल्ह्याच्या सीमा केल्या होत्या. त्यामुळे जिल्हा अंतर्गत संपर्क तुटला होता. गावागावांने दगड, झाडे टाकून रस्ते अडविले आहेत. अनेक शेतकरी जिल्ह्याच्या सीमेवर राहतात. त्यांची शेती शेजारील जिल्ह्यात आहे,


पण जिल्हा सील केल्याने त्यांना शेजारील जिल्ह्यातील शेती करता येत नव्हती. जनावरांना चारा आणता येत नव्हता. त्यामुळे शेतीचे नुकसान व जनावरांचे हाल होत होते. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर असणारे शेतकरी अडचणीत होते. पण राज्याअंतर्गत दोन जिल्ह्यातील सीमा हद्दीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कामासाठी जाण्याची मुभा दिली आहे. 

समितीची परवानगी आवश्‍यक 
प्रत्येक गावागावांत सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावकामगार तलाठी, पोलिसपाटील यांची समिती गठित केली आहे. ही समिती गावात बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवून असते. शेजारील जिल्ह्यातील शेतकऱ्याला गावातील त्याच्या मालकीची शेती करण्यास या समितीकडून परवानगी घेणे मात्र बंधनकारक आहे. पण ही मुभा दोन राज्यातील सीमा भागातील शेतकऱ्यांना दिलेली नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT