कोल्हापूर

परवानाधारक रिक्षाचालकांनो 'या' लिंकवर करा अर्ज

अर्चना बनगे

कोल्हापूर : परवानाधारक रिक्षाचालकांचे (permitted auto driver) अनुदान थेट बँकेत जमा होणार आहे. यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांनी केले आहे. ही माहिती त्यांनी फेसबुक अकौंटवरून दिली आहे.(permitted-auto-driver-apply-for-Grants-on-government-website-kolhapur-news)

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवाना धारकांना रु. १५००/- चे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 'आयसीआयसीआय' बँकेतर्फे स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

यासाठी ही लागणार कागदपत्रे

परवानाधारक रिक्षाचालकांचे ऑटोरिक्षा वाहन क्रमांक, लायसन्स आणि आधार क्रमांकाची माहिती रिक्षाचालकांनी संगणक प्रणालीवर भरायची आहे. संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांना खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठीची लिंक:

https://transport.maharashtra.gov.in/.../Autorickshaw

या वेळेतच करा अर्ज

परवानाधारक रिक्षाचालकांनी विहीत कागदपत्रे सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेतच वेबसाईटवरती सादर करायची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI युगात मोठी संधी, पण राष्ट्रीय सुरक्षेची आव्हानेही गंभीर... भारताचे माजी Deputy NSA पंकज सरन यांची AP Globale Digital ला खास मुलाखत

Business Idea: पावसाळ्यात कमाईची मोठी संधी! फक्त 5,000 रुपयांपासून सुरू करा हे 10 फायदेशीर व्यवसाय; कमी गुंतवणुकीत मोठी कमाई

Mumbai News: राज्यात पावसाचा हाहाकार! ६३ जणांचा मृत्यू, प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; गिरीश महाजन यांची घोषणा

Palghar 10 Foot Python Rescue : रात्री 10 वाजता घरात शिरला 15 किलो वजनाचा तब्बल 10 फुटांचा अजगर! गावकऱ्यांची उडाली झोप, पुढं काय घडलं?

पाकिस्तानी गँगस्टरकडून नागपूरच्या युवकांना फुस; १० जणांना एटीएसने घेतलं ताब्यात, कसा केला जात होता संपर्क?

SCROLL FOR NEXT