Petrol diesel prices high An increase of 30-35 paise per week vehicle kolhapur marathi news 
कोल्हापूर

पेट्रोल-डिझेल होणार आता शंभर रुपये लिटर ; दर राहणार चढेच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :पेट्रोल आणि डिझेल दरात रोज ३०-३५ पैशांनी वाढ होत आहे. आठवड्यात पेट्रोलमध्ये ९१ पैसे, तर डिझेलमध्ये ९३ पैशांची वाढ झाली. पेट्रोल ९४ रुपये दोन पैसे, तर डिझेल ८३ रुपये पाच पैसे असा आजचा प्रतिलिटर दर आहे.


केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्र शासन इंधनावरील कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले. नजीकच्या काळात इंधनाचे दर वाढतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या (क्रुड) तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे इंधनदरातही वाढत होत आहे. कोरोनाकाळात क्रुडच्या किमती कमी झाल्या, त्यावेळी इंधनाचा दर कमी करणे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय अबकारी कर वाढवून इंधनाचे दर तेवढेच ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला. आता वाढत्या क्रूडच्या किमती वेळी ते कर कमी होणे अपेक्षित होते, मात्र ते केले जात नाहीत. 

आठवड्यात होतेय ३०-३५ पैशांची वाढ

पेट्रोल-डिझेलची दरवाढ ग्राहकांना परवडणारी नाही. इंधनावरील कर कमी केल्यास दर कमी होणे शक्‍य आहे. मात्र केंद्रीय पातळीवर कर कमी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरच शंभर रुपये लिटरने पेट्रोल घ्यावे लागणार आहे.
-गजकुमार माणगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल मालक असोसिएशन

गणित दराचे 
पेट्रोल      डिझेल
 मूळ दर ः ३१ रुपये ७१ पैसे       ३१.५९
 केंद्र सरकारचा कर ः ३२ रुपये ३९ पैसे     ३२.६८
 राज्य शासनाचा कर ः २६ रुपये २३ पैसे     १६.५०
 परवाना फी ः ०.४४ पैसे    ०.३६ 
 डीलर कमिशन ः ३ रुपये २५पैसे     २.१८
 एकूण रुपये ः ९४.०२    एकूण रुपये ः ८३.३१

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT