Phone calls for health information from karnatka government  
कोल्हापूर

तुम्हाला फोन येईल ; माहिती द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा....

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - आरोग्य विषयक माहिती घेण्यासाठी फोन येईल, त्यावेळी आरोग्याची योग्य माहिती द्या अन्यथा कायदेशीर कारवाई होईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. एस बी बोमनहळ्ळी यांनी दिला आहे. पुढील २८ दिवस राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक मोबाईल धारकाला फोन केला जाणार आहे.

८१९७९७२५५५ या मोबाइल क्रमांकावरून स्वयंचलीत कॉल म्हणजे फोन केला जाणार आहे. तर बेळगाव जिल्ह्याच्या कोरोना हेल्पलाईन क्रमांकावरून म्हणजे ०८३१-२४३६९६० या क्रमांकवरूनही कॉल केला जाणार आहे. राज्याचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्यावेळी वरील दोन्ही क्रमांकावरून फोन येईल त्यावेळी आरोग्याबद्दलची योग्य व खरी माहिती दिली पाहिजे असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

 हिंदी व कन्नड या दोन भाषेत संवाद साधण्याचा पर्याय

हे दोन्ही क्रमांक नागरिकांनी 'बेळगाव हेल्थ मोनिटरिंग' या नावाने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावेत. या क्रमांकावरून कॉल आला तर तो स्वीकारलाच पाहिजे असेही सांगण्यात आले आहे. कॉल आल्यानंतर हिंदी व कन्नड या दोन भाषेत संवाद साधण्याचा पर्याय असेल. ज्या सूचना दिल्या जातील त्याचे पालन करावे लागेल असेही सांगण्यात आले आहे. कोरोना संदर्भात माहिती देणे व आरोग्याशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऐकून घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळेच फोन घ्या अन्यथा कारवाई होईल असा इशाराच जिल्हाधिकार्यांनी दिला आहे. या माध्यमातून प्रशासन कोरोना संशयितांचा शोध घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT