Pipe ruptures in Mhasurli 
कोल्हापूर

म्हासुर्लीत पाईप फुटली, ग्रामस्थांची 15 दिवस पाण्यासाठी वणवण 

केरबा जाधव

धामोड : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथे नव्या झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी ठेकेदाराने खोदाई केल्याने नळपाणी पुरवठा योजनेच्या पाईप फुटल्या आहेत. परिणामी गेल्या पंधरा दिवसा पासून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संबधित ठेकेदाराकडून पाईपलाईन बसविण्यासाठी चालढकल होत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

म्हासुर्लीसह, कुंभारवाडी, अस्वलवाडी, झापाचीवाडी या गावांना पिण्याच्या पाण्याची कोट्यवधी रुपये खर्चून सुमारे दहा वर्षापूर्वी संयुक्त नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वाड्या वस्तीमधील पाणी प्रश्‍न सुटण्यास हातभार लागला आहे.

मात्र, म्हासुर्लीसह धामणी खोऱ्यातील गावांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्यात आले आहे. तर सध्या सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी संबंधित विभाग व ठेकेदाराने गावच्या मुख्य पाणी पुरवठा योजनेच्या टाकी जवळ मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून जेसीबीव्दारे खोदाई सुरू केली आहे. खोदाईमध्ये गावच्या नळ पाणी योजनेच्या पीव्हीसी सापडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे गावचा पाणी पुरवठा सुमारे पंधरा दिवसा पासून बंद पडला आहे. 

ठेकेदाराने पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्ती बाबत गेल्या दहा-बारा दिवसांपासून चालढकल केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन गावचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी पाणीपुरवठा बंद आहे. संबंधित ठेकेदारांना या संबंधित माहिती दिलेली आहे. पाणीपुरवठा दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. 
- विराज गणबावले, ग्रामसेवक 


दृष्टिक्षेप 
- म्हासुर्लीसह चार गावांना पाणी पुरवठा 
- कोट्यवधी खर्चुन दहा वर्षापुर्वी पाणी योजना कार्यान्वित 
- ठेकेदाराकडून गळती काढण्यास चालढकल 
- ग्रामस्थांतून तीव्र संताप 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT