Planted Chafa trees on jotiba hills kolhapur 
कोल्हापूर

जोतिबा डोंगरावर परत फुलणार आता 'तो' चाफेबन...

निवास मोटे

जोतिबा डोंगर - महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर ता.पन्हाळा या ठिकाणी असणाऱ्या यमाई मंदिर परिसरात आता चाफेबन फुलणार असून यासाठी दख्खन केदार सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यांनी यमाई मंदिर परिसरात ४०० चाफा झाडांचे वृक्षारोपन केले. त्या बरोबरच आंबा,जांभळ, जास्वंद तसेच इतर फुलझाडे लावलीत.

या फाउंडेशनने या मोहीमेस सुंदर चाफेबन मोहीम हे नाव दिले असून या मोहिमे अंतर्गत यमाई मंदिर परिसर स्वच्छता, परिसर शुशोभिकरण प्राचीन असे जमदग्नी तीर्थ यांचेही संवर्धन केले जाणार असून चाफेबनामुळे आता यमाई मंदिराला शोभा येणार आहे. चैत्र यात्रेला येणाऱ्या भाविकांना ही चाफे बनातून आनंदाने बागडता येणार आहे .
 श्री जोतिबा डोंगरावरील यमाई मंदिर परिसरात पूर्वी मोठे असे चाफेबन होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाफ्याची झाडे होती. या फुलांचा सुंगधाने परिसर सुंगंधी व्हायचा. चाफ्याची फुले वेचण्यासाठी गर्दी व्हायची. त्यामुळे हा परिसर सुंदर व देखणा असा होता.

काळाच्या ओघात यमाई मंदिर परिसरात चाफेबन नामशेष झाले.त्याचे एक ही झाड पाहण्यासाठी शिल्लक राहिले नाही.याच चाफेबन परिसराला पुनर्वैभव प्राप्त करण्याचा विचार जोतिबा वरील केदार विजय ग्रंथ अभ्यासक सुनील अमाणे यांना पडला. त्यांनी या सोशल फाउंडेशनच्या मंडळींशी याबाबत आपले मत मांडले आणि फाउंडेशन मधील मंडळींनी यास तात्काळ सन्मती दिली आणि चाफेबन करण्याचा निर्णय झाला.

त्यानुसार कोकण, शाहूवाडी, वारणानगर परिसरातून चाफे झाडे उपलब्ध केलीत. कालच जोतिबाची उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांच्या हस्ते या मोहीमेस प्रारंभ झाला. यावेळी दख्खन केदार सोशल फौडेशनचे सुनिल आमाने,अमित मिटके,रोहीत संभाजी मिटके,सागर जाधव,केदारनाथ पवार,राहुल खडके,उदय पाटील,महेश बनकर,वैभव झुगर,प्रमोद भिवदर्णे आदी उपस्थीत होते .

दख्खन केदार सोशल फोंडेशनच्या माध्यमातून आम्ही जोतिबा डोंगरावर यमाई मंदिर परिसरात चाफेबन करण्याचा निर्धार केलाय.चाफेबनाला वैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही झटणार आहोत.

- राहूलकुमार  खडके
(कराड) फोंडेशन सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

Varandha Ghat Closed : पुणे-रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; 'या' तारखेपर्यंत वरंध घाट राहणार बंद! जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT