Plaster of Paris was banned for making Ganesh murti order was extended by one year 
कोल्हापूर

गणेश मूर्ती बनवण्यासाठीच्या 'त्या' आदेशाला एक वर्षाची मुदतवाढ...

सकाळवृत्तसेवा

कणकवली - पर्यावरण प्रेमीकडून मागणी होत असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती बनवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र या आदेशाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विट द्वारे दिली आहे. त्यामुळे गेले वर्षभर तयार झालेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश शाळांच्या कलाकारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात विषेशतः कोकण पट्ट्यामध्ये घरोघरी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते. पूर्वीच्या काळात पारंपरिक पद्धतीने स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या मातीच्या सहाय्याने गणेश मूर्ती बनवल्या जात होत्या.त्यासाठी नैसर्गिक रंगही तयार केले जात होते पण काळाच्या ओघात तंत्रज्ञानाबरोबरच गणेश मूर्ती बनवण्यासाठी व्यावसायिक रूप तयार झाले. शेकडो गणेश शाळा गावागावात निर्माण झालेल्या पनवेल सारख्या भागात तर गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने निर्माण झाले. या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती किंवा नवरात्र उत्सवासाठी देवीच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या. या मुर्त्यांचे जेव्हा विसर्जन होते त्यावेळी नदी समुद्र किंवा नाल्यांमध्ये अशा प्लास्टर ऑफ पॅरिसचे विघटन होत नव्हते. त्यामुळे धार्मिक सणानंतर मूर्ती विसर्जना वरून अनेक वाईट घटना घडत होत्या.ज्या मुर्त्यांचे पूजन होते अशा मुर्त्या अस्ताव्यस्त पसरल्या जात होत्या.

स्वच्छता करत असताना कामगार अशा मुर्त्या जागोजागी एकत्र करून पुन्हा त्यांची विल्हेवाट लावत असा प्रकार घडत होता. यावर पर्याय म्हणून आणि पर्यावरण संरक्षण या कारणाने गणेश मुर्त्या शाडू मातीच्या किंवा कागदाच्या लगद्याच्या तयार कराव्यात आणि त्या पर्यावरणास पूरक असावे असा निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला होता. अगदी सध्याच्या साथरोग काळात हा निर्णय घोषित करण्यात आला होता. आता हा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मागे घेत या निर्णयाला वर्षभराची मुदतवाढ दिली यांनी दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT