कोल्हापूर

खेळाडूंचा आत्मविश्‍वास  डळमतीत होण्याची शक्‍यता 

सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत, या कालावधीत खेळाडूंच्या मानसिकतेवर याचा गंभीर परिणाम होऊ लागला आहे. यातूनच खेळाडूंच्या मेंटल इंज्युरीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यामुळे खेळाडूंमधील स्वतःतील सामर्थ्यावरच विश्वास ठेवण्यात कमतरता येण्याची शक्‍यता आहे. 
खेळाडूंना शारीरिक दुखापतीहूनही अधिक परिणामकारक असते ती मानसिक कमकुवतता, अशाच मानसिक दुखापतींचा धोका सध्या खेळाडूंसमोर वाढत आहे. काही महिन्यांपासून मैदान आणि स्पर्धांपासून दूर असणाऱ्या खेळाडूंमध्ये मानसिक नैराश्‍य येऊ लागले आहे. 


घरी राहून हवा तितका सरावकरून मैदान आणि प्रत्यक्ष स्पर्धेमधील सहभागापासून लांब असल्यामुळे याचा थेट परिणाम खेळाडूंच्या आत्मविश्वासावर होत आहे. स्पर्धेसाठी केलेल्या तयारीचा जितका वाटा जिंकण्यासाठी असतो, तितकाच वाटा आत्मविश्वासाचा असतो. अनेक खेळाडूंचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यामुळे भविष्यात सुरू होणाऱ्या स्पर्धांना कसे सामोरे जायचे? असा विचार ते करत आहेत. 
लॉकडाउनच्या कालावधीत अनेक खेळाडूंनी स्वतःच्या फिटनेसवर आणि खेळातील कौशल्य आत्मसात करण्यावर विशेष भर दिला आहे. सातत्यपूर्ण प्रॅक्‍टिसमुळे योग्य टेक्‍निक देखील आत्मसात केली आहे. असे असले तरीही स्पर्धाना सामोरे जातानाची मानसिकता ही प्रत्यक्ष स्पर्धा सुरु होईपर्यंत निर्माण होणे शक्‍य नाही. 

मानसिक स्वास्थ राखण्यासाठी 
* नैराश्‍यातून बाहेर येण्यासाठी योग करणे 
* ध्यान धारणा आणि चिंतन करणे 
* योग्य आहार आणि स्वतःचा सराव सुरू ठेवणे 
* व्यसन न करणे 
*मार्गदर्शकांशी आणि प्रशिक्षकांशी वेळोवेळी चर्चा करणे 


खेळाडूंसाठी मानसिक स्वास्थ राखण्याचे सर्वात आव्हान आहे. स्पर्धांपासून लांब असताना निव्वळ सराव आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन महत्त्वाची बाब आहे. नैराश्‍य येऊ न देण्यासाठी स्वतःच्या खेळाचा अभ्यास आणि सातत्याने नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य दिल्यास नैराश्‍य येण्यापासून बचाव होऊ शकतो. 
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी. 

मानसिक नैराश्‍य येणे हे खेळाडूसाठी सर्वाधिक घातक आहे. शारीरिक दुखापती ठीक होणे सोपे असले तरी मानसिक दुखापत ठीक होण्यासाठी बराच कालावधी जातो. यातून लवकर बाहेर पडणे महत्त्वाचे असते. अधीक काळ खेळापासून लांब राहिल्यास खेळाडूंत मानसिक दडपण निर्माण होण्यास सुरवात होते. अशा खेळाडूंना मानसोपचारतज्ज्ञ म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतो. 
- भूषण चव्हाण, मानसोपचारतज्ज्ञ, सावली केअर सेंटर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

SCROLL FOR NEXT