कोल्हापूर

पेठांतील ईर्षेत अडकले खेळाडू

छत्रपती शाहू स्टेडियमची रग न अनुभवलेल्या काही फुटबॉलपटूंचा जिल्ह्याबाहेरील संघात दबदबा

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्या खेळाडूंच्या पायातील रग छत्रपती शाहू स्टेडियमने अनुभवली नाही, तेच खेळाडू कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील संघात कोल्हापूरच्या नावाला वलय तयार करत आहेत. पेठा-पेठांतील ईर्षेत अडकलेले खेळाडू मात्र संघावरील प्रेमापोटी कोल्हापूर सोडायला तयार नाहीत. घरच्या आर्थिक अडचणींची कारण देत त्यांचा फुटबॉल शाहू स्टेडियममध्येच रमला आहे. त्याची फलनिष्पत्ती काय, असा प्रश्न विचारला तरी त्याचे उत्तर काय द्यायचे, हेच मोठे कोडे आहे.

शाहुपुरीतला अनिकेत जाधव हैदराबाद फुटबॉल क्लबकडून खेळत आहे. तो मूळचा कोल्हापूरचा असूनही इथल्या स्थानिक संघात खेळला नाही. निखिल कदम कोल्हापूरचा असून, तो कोलकत्तातील मोहामेडन स्पोर्टिंगकडून आयलीग खेळला आहे. कागल तालुक्यातला सुखदेव पाटील अहमदाबादच्या अॅरा फुटबॉल क्लबकडून खेळला आहे. करवीर तालुक्यातला इंद्रजित चौगुले पुण्यातील डीएसके शिवाजीयन्सकडून खेळत होता. तो संघ बंद पडल्यानंतर त्याला कोल्हापुरातल्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लबला आधार मिळाला.

रोहन आडनाईक चर्चिल ब्रदर्स, ओंकार मोरे अॅरा फुटबॉल क्लबकडून फुटबॉलमधील कौशल्य दाखवले आहे. यातील निखिल व रोहन सध्या कोरोनामुळे कोल्हापुरात परतले आहेत. गेल्या पाच वर्षांचा विचार करता शहरातील उत्सव मळकर व नियाज पटेल यांनी जिल्हा सोडून जिल्ह्याबाहेरील संघात करिष्मा दाखवला. केएसकेकडून होणाऱ्या निवड चाचणीसाठी स्थानिक संघातील खेळाडू नक्की सहभागी होतात. केएसए संघाकडून त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो. कोल्हापूर सोडून परजिल्ह्यातील संघात खेळण्याचा त्यांचा आकडा फारच अल्प आहे.

गडहिंग्लजमधील खेळाडूंचा बाहेर खेळ उत्कृष्ट

गेल्या सहा-सात वर्षांत गडहिंग्लजमधील खेळाडू त्यामानाने परजिल्ह्यातील संघात उत्कृष्ट खेळले. त्यात शकील पटेल (मुंबई कस्टम, बीईएमएल, मलबार युनायटेड), नागेश राजमाने

(आर. सी. एफ, हेवर्डस), विक्रम पाटील (इंडियन बॅंक, चेन्नई. बीईएमएल, बंगळूर), निखिल खन्ना (गोवा, इंडियन बॅंक, डीएसके शिवाजीयन्स), किरण मोहिते, चिमा बांदार, गजानन सुळेभावीकर (१९ वर्षाखालील महिंद्रा‌ युनायटेड), सौरभ पाटील (साळगावकर फुटबॉल क्‍लब, गोवा), अनिकेत कोल्हे, सागर पोवार, सुलतान शेख (डीवायएसएस, बंगळूर), महेश सुतार (पुणे फुटबॉल क्‍लब १९ वर्षाखालील) यांचा समावेश आहे.

तेच खेळाडू, तेच फुटबॉल संघ व तेच प्रशिक्षक असेच सर्वसाधारण चित्र कोल्हापुरातल्या फुटबॉल हंगामात राहील, यात शंका नाही. फुटबॉलचा गाजावाजा येथे कितीही होत असला तरी इथले फुटबॉल विश्व बदलायला तयार नाही. खेळाडू परजिल्ह्यात अथवा राज्यात जाऊन खेळण्याच्या मानसिकतेत आजही नाहीत. छत्रपती शाहू स्टेडियम पुरते मर्यादित राहिलेला फुटबॉल कूस बदलणार का, हाच प्रश्न आहे. त्यावर आधारित मालिका आजपासून....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT