Narendra modi narendra modi
कोल्हापूर

पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे उंचावले मनोधैर्य

लुमाकांत नलावडे

कोल्हापूर : गाव निहाय समित्या सक्षम करा, एक एक गाव कोरोना मुक्त करा, ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहेत त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी हे प्रथम कोरोना योद्धा आहेत, त्यांनी सतर्क राहून काम करावे अशाही सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील काही राज्यातील आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी(Collector) यांना केले. पंतप्रधान मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्गदर्शनातून केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई Collector Daulat Desai) यांनी आज पत्रकारांना दिली.(pm-narendra-modi-meeting-with-district-collectors-on-covid-19-situation-kolhapur-news)

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत देशातील काही राज्यातील काही जिल्हे आणि महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, अधिकारी हे प्रथम कोरोना योद्धा आहेत, त्यांनी जिल्ह्यामध्ये जे प्रतिबंधात्मक उपाय राबविले आहेत, यशस्वी झाले आहेत ते केंद्र शासनाकडे पाठवावा, शक्य आहे ते प्रयोग देशभर राबविण्यात येतील.गाव पातळीवरील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना यांनी मिळून केलेल्या कामाचे कौतुक ही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले.

महाराष्ट्र राज्यातील केवळ अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नियोजित कार्यक्रमानुसार प्रेझेंटेशन करण्यास संधी देण्यात आली. एकंदरितच सर्वांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे दीड-दोन तासांच्या vc मध्ये केले.यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री हर्षवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सचिवही उपस्थित होते. सर्वप्रथम सचिवांनी थोडक्यात माहिती देऊन व्हीसी ला सुरुवात केली. साधारण दीड ते दोन तास व्हीसी सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT