Police and gangsters opened fire in Kolhapur after thirty years kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापुरात १३ वर्षांनंतर पुन्हा पोलिस आणि गुंडांत घडलीय चकमक...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात यापूर्वी चारवेळा पोलिस आणि गुंडांत चकमक झाली होती, चारही घटनांत गुन्हेगार ठार झाले होते. तब्बल १३ वर्षांनी पुन्हा कोल्हापूर परिसराने गुंड आणि पोलिसांच्यातील चकमकीचा थरार अनुभवला. 
यापूर्वी कामगार नेते दत्ता सामंत यांच्या मारेकऱ्यांनीही कोल्हापुरातील एका मध्यवस्तीत असलेल्या हॉटेलमध्ये आश्रय घेतला होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांच्या पथकाने ताराराणी चौकातील या हॉटेलमधून मुंबईच्या गुन्हेगारी वर्तुळाशी संबंधित गुंडाला अटक केली होती. 

ब्या मयेकरचा एन्काउंटर

पोलिस आणि गुंडामध्ये चकमक ही अंडरवर्ल्डची राजधानी असलेल्या मुंबईत नवी नव्हती; पण त्याचे लोण हे कोल्हापूरपर्यंत पोहचल्याचे यापूर्वी घडलेल्या अनेक चकमकीवरून स्पष्ट झाले होते. बेळगावात राहणाऱ्या सुरेश मंचेकर या खतरनाक गुन्हेगाराचाही खात्मा मुंबईच्या पोलिसांनी कोल्हापुरातच केला होता. त्यानंतर स्थानिक पोलिस अनेक वर्षे कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या बाब्या मयेकरचा एन्काउंटर केला होता. 

सुरेश मंचेकर याचा एन्काऊंटर

चंदगड तालुक्‍यातील नागनवाडी येथील बांदिवडेकर कुटुंबातील सुरेश याचा स्थानिक पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. १९९८ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर कोल्हापुरात गुंड आणि पोलिसांमधील चकमक फारशी 
बघायला मिळाली नव्हती. त्यानंतर २००२ मध्ये छोटा राजन टोळीतील बाब्या मयेकर याचा, २००३ मध्ये ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाच्या चकमकीत मंचेकर टोळीचा प्रमुख सुरेश मंचेकर याचा एन्काऊंटर झाला आहे. 

यापूर्वीचे एन्काउंटर असे

  • १ जून १९९८ - नामदेव बांदिवडेकर यांचा चंदगड येथील शिरगाव फाट्याजवळील शासकीय विश्रामगृहासमोर खून झाला. त्याच दिवशी पोलिस चकमकीत सुरेश बांदिवडेकर ठार झाला. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली होती. 
  • १३ सप्टेंबर २००२ - छोटा राजनचा उजवा हात समजला जाणारा बाब्या मयेकर चित्रनगरीजवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली होती. 
  • १५ ऑगस्ट २००३ - मध्यवर्ती बसस्थानकाजवळील परीख पुलाजवळ पहाटे अडीच वाजता ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांनी मंचेकर टोळीचा प्रमुख सुरेश मंचेकर याला एन्काऊन्टरमध्ये ठार केले. 
  • ३० ऑक्‍टोबर २००७ - टोप (ता. हातकणंगले) जवळ हॉटेल आम्रपालीसमोर गुरू साटम टोळीतील विजयकुमार ऊर्फ पेटा चौधरी हा चकमकीत ठार झाला. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा व कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कारवाई. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT