Police arrested people who gathered for prayer in Gadhinglaj masque
Police arrested people who gathered for prayer in Gadhinglaj masque 
कोल्हापूर

गडहिंग्लज मध्ये सामूहिक नमाज पठणासाठी जमलेल्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात... 

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज - देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने संचार बंदी तसेच जमाव बंदीचा आदेश काढलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. जमाव बंदी असताना देखिल शहरातील मुख्य मार्गावरील सुन्नी जुम्मा मशिदीत आज शुक्रवारची सामूहिक नमाज पठण करण्यास एकत्र आलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.आज दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली.

 मशिदीला समोरून कुलूप लावले आहे. परंतु आज काही जण मागील दरवाजाने मशिदीत जाऊन नमाज पठण करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी पोलीस कर्मचारी व व्हॅनसह येऊन कारवाई केली. पोलीस आल्याचे कळताच बरेच जण पळून गेल्याचेही समजते. तर काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्याला घेऊन गेले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सोशल डिस्टसिंग ठेवण्याची सुचना करत असताना देखील लोक समुहाने एकत्र येत असल्याने पोलिस प्रशासन कडक पावले उचलत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT