Police on Chandoli dam are insecure 
कोल्हापूर

चांदोली धरणावरील पोलिसच असुरक्षित 

दिग्विजय कुंभार

आंबा :  उखळू गावापासून दोन किलोमीटर अंतरावर चांदोली धरण आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी येथे चार पोलीस ड्युटी बजावत आहेत. सुविधांअभावी त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या धरणाची सुरक्षा करणारे पोलिसच "असुरक्षित' राहिले आहेत. 

पोलीसांना निवाऱ्यासाठी चारी बाजूंनी पत्रा वापरून शेड उभारले आहे. गळती लागल्याने पत्र्यावर प्लास्टीकचा कागद टाकला आहे. खिडक्‍या पूर्णपणे उघड्या आहेत. लाथ घातली तर मोडून जाईल अशी दरवाजाची अवस्था आहे. त्यामुळे साप, विंचू, मोठाले भोंगे, विविध प्रकारचे किडे व किटक आत येत असता. चौकीला संरक्षक कठडा नाही. रात्रीच्या वेळी परिसरात बिबटे, अस्वल, रानडुकरे, भेकर व रानगव्यांच्या कळपांचा संचार असतो. अशा परिस्थितीत पोलीस आपल्या जीवावर उदार होऊन ड्युटी बजावत आहेत. 

पत्र्याच्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. येथील पाणीप्रश्‍न गंभीर स्वरुपाचा आहे. पाणी पिण्यासाठी व खर्चासाठी धरणातून पाचशे मीटरवरुन किंवा काही वेळेस दीड किलोमीटरची पायपीट करून पॉवर हाऊसमधून आणावे लागत आहे. गॅस किंवा इलेक्‍ट्रीक शेगडीची सोय नसल्यामुळे त्यांना चुलीवर जेवण बनवावे लागते. चौकीपर्यत जाण्यासाठी पूर्ण कच्चा रस्ता आहे. 

साप, विंचू आणि जंगली श्वापदांच्या सानिध्यात राहूनही केवळ धरणाच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन पोलीस कर्मचारी जीवावर उदार होऊन ड्युटी बजावत आहेत. चौकीत सुविधांचा अभाव आहे ही वस्तुस्थिती आहे. येथील सोयीसुविधांसाठी वरिष्ठ कार्यालयासह पाटबंधारे विभागाला दुरुस्ती व सुविधा याबाबत कळवले आहे. 
- भालचंद्र देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक, शाहूवाडी 


दृष्टिक्षेप 
- निवाऱ्यासाठी असलेल्या पत्र्याला गळती 
- साप, विंचू, किड्यांचा निवाऱ्यात येण्याचे प्रकार 
- चौकीला संरक्षक कठडा नाही 
- रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा संचारामुळे धोका 

कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT