police constable see face baby on whatsapp call 
कोल्हापूर

बाप बनलेला एक पोलिस कॉन्स्टेबल 52 दिवस झाले, आपल्या चिमुकल्याला पाहातोय असं...

सुधाकर काशिद

कोल्हापूर : बाप होणे हा आनंदाचा क्षण आणि लेकराचे तोंड पहिल्यांदा पाहणे, हा त्याहून मोठा आनंदाचा क्षण. पण, बाप बनलेला एक पोलिस कॉन्स्टेबल गेले 52 दिवस झाले या आनंदापासून वंचित आहे. तो पुण्यात बंदोबस्ताला आहे.

बंदोबस्ताचा ताण आणि पुण्यासारख्या रेड झोनमधून येऊन लेकराला कुशीत घेण्याची कल्पनाही त्याला धस्स करणारी आहे. त्यामुळे 52 दिवस झाले, तो आपले लेकरू मोबाईलवरून व्हॉट्‌सऍप कॉलच्या आधारे पाहतो आहे. मोबाईलची स्क्रीन अवघ्या पाच इंचाची. पण, त्यातही लेकराचा छोटा गोंडस चेहरा त्याला आभाळाएवढा दिसत आहे. लॉकडाउनच्या काळात पोलिस कोणकोणत्या परिस्थितीत काम करीत आहेत, याचे हे एक वेगळे उदाहरण आहे. 

शशिकांत पाटील या पोलिस कॉन्स्टेबलच्या रोजच्या घालमेलीची ही रोजची अवस्था आहे. ते सांगलीचे व त्यांच्या पत्नी वर्षा अंबप कोल्हापूरच्या. त्या बाळंतपणासाठी डॉ. सतीश पत्की यांच्याकडे दाखल होत्या. लॉकडाउन लागेल, तो वाढेल याची कोणालाच कल्पना नव्हती. आणि ज्या दिवशी वर्षा प्रसूत झाल्या, त्याच दिवशी लॉकडाउनला सुरवात झाली.

चेहरा व्हॉट्‌सऍप कॉल करून पाहिला

लॉकडाउनचा बंदोबस्त, हा बंदोबस्ताचा प्रकारही नवा. त्यामुळे शशिकांत यांना तातडीने लेकराचे तोंड पाहण्यासाठी कोल्हापूरला येणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांनी लेकराचा चेहरा व्हॉट्‌सऍप कॉल करून पाहिला. त्यानंतर लॉकडाउन वाढत गेला. त्यामुळे पुण्यातून कोल्हापूरला येण्याचा मार्गही बंद झाला.

बाप बनल्याचा आनंद क्षणभर बाजूला

त्याहीपेक्षा रेडझोन परिस्थितीत रोजच्या रस्त्यावरील बंदोबस्तामुळे पोलिसांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे शशिकांत यांनी बाप बनल्याचा आनंद क्षणभर बाजूला ठेवला. या परिस्थितीत रेडझोनमधून येऊन मुलाचे तोंड पाहण्यापेक्षा कोरोनाचे वातावरण निवळल्यावरच कोल्हापूरला येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे 52 दिवस ते रोज व्हॉट्‌सऍप करूनच लेकराला पाहत आहेत. त्यातही त्यांना मिळणारा आनंद एक बाप म्हणून लई भारी आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup मध्येही वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम! बांगलादेशविरुद्ध अर्धशतक पूर्ण करताच रचला नवा इतिहास

Weekly Tarot Card 19 to 25 January: बुधादित्य राजयोग मेष, वृषभसह 'या' 5 राशीच्या लोकांना आयुष्यात मिळेल यश, वाचा टॅरो कार्डनुसार साप्ताहिक राशिभविष्य

Maharashtra Municipal Elections 2026 : नगरसेवक तर निवडून आले पण महापौर पदाचं काय? कधी जाहीर होणार आरक्षण? वाचा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरच्या मनुर कोल्हाडी उपसा सिंचन योजनेचे कोट्यवधी रुपयाचे भंगार चोरीला, एकनाथ खडसेंचा आरोप

Kolhapur vote : सर्वांत लहान नगरसेविका ते अनवाणी प्रचाराचा संघर्ष; मतमोजणी केंद्रातील मानवी कथा

SCROLL FOR NEXT